महागाईच्या कात्रीत मुंबईकर
सीएनजी दरवाढीने रिक्षा-टॅक्सी प्रवास महाग; दुधाच्या दरवाढीनेही सर्वसामान्य त्रस्त
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता २ : रिक्षा एक रुपया तर टॅक्सीभाडे दोन रुपयांनी वाढले तसेच म्हशीचे सुटे दूध नऊ रुपयांनी महागल्याने सर्वसामान्य नागरिकांना प्रचंड महागाईचा फटका बसत आहे. त्यातच सीएनजी दोन रुपयांनी महाग झाल्याने रिक्षा-टॅक्सीचालक आणि ग्राहक संताप व्यक्त करीत आहेत.
आधीच महागाई वाढली असून, आता रिक्षा-टॅक्सी प्रवास आणि दूध याची भर पडल्याने मुंबईकरांना घर चालवताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
चालकांचे म्हणणे आहे, की सीएनजी गॅस दिवसेंदिवस महागत असताना एक रुपयाची भाडेवाढ नगण्य आहे. त्यामुळे आमचे आर्थिक गणित कोलमडले आहे. मुंबई आणि महानगर क्षेत्रात सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच सीएनजीचे दर वाढल्याने ऐन सणासुदीत मुंबईकरांना आर्थिक फटका बसत आहे.
आम्ही महागाईला कसे सामोरे जायचे, हे समजत नाही. दररोज काही ना काही महाग होत आहे. सरकारने या सर्व गोष्टींकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे.
- नम्रता गवळे, प्रवासी
मुंबईमध्ये जगणं कठीण झालं आहे. सर्वत्र महागाईचे झटके बसत आहेत. आता टॅक्सीचं भाडेदेखील वाढलं आहे. बेस्टही वेळेवर येत नाही. सर्वसामान्य नागरिकांनी नक्की आता उदरनिर्वाह करायचा कसा, हा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
-पीयूष तांबे, प्रवासी
रिक्षा आणि टॅक्सीसाठी भाडेवाढ लागू करण्यात आली आहे. आता मीटर अद्ययावतीकरणासाठी खर्च आहे. त्यासाठी चालकाचा रोजगार बुडतो. त्यामुळे भाडेवाढ करून फायदा झाला का, असा प्रश्न आहे.
- राजेंद्र देसाई, सरचिटणीस महाराष्ट्र रिक्षाचालक संघटना
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.