मुंबई

पालिका मुख्यालयाची सुरक्षा वाऱ्यावर

CD

पालिका मुख्यालयाची सुरक्षा वाऱ्यावर
३० सीसीटीव्ही बंद असल्याची प्रशासनाची कबुली

सकाळ वृत्तसेवा
​मुंबई, ता. २ : महापालिकेच्या ऐतिहासिक मुख्यालय इमारतीच्या सुरक्षेबाबत एक धक्कादायक बाब समोर आली आहे. पालिकेच्या मुख्य इमारतीमधील तब्बल ३० सीसीटीव्ही कॅमेरे बंद अवस्थेत असल्याची कबुली खुद्द पालिका प्रशासनाने दिली आहे. या सुरक्षेतील गंभीर त्रुटींवरून स्थायी समितीत सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले; मात्र विरोधकांचे सर्व आक्षेप डावलून ८७ नव्या ‘एआय’ आधारित अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा सुमारे ३.४५ कोटी रुपयांचा प्रस्ताव अखेर मंजूर करण्यात आला.
महापालिका मुख्यालयात दररोज हजारो नागरिक आणि व्हीआयपींची ये-जा असते. शिवसेना (ठाकरे गट) नगरसेविका मीनाक्षी पाटणकर यांनी प्रशासनाच्या या ढिसाळ कारभारावर जोरदार हल्लाबोल केला. मुख्यालयातील कॅमेरे बंद असताना इतके दिवस प्रशासन काय करीत होते, हा सुरक्षेशी खेळ असून प्रशासनाने सुरक्षेकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे, असा थेट आरोप त्यांनी केला.
भाजपचे तेजिंदर तिवाना यांनी या निविदेतील कॅमेऱ्यांच्या दरांवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण केले. जुन्या कॅमेऱ्यांच्या तुलनेत यंदा निविदेत तब्बल चार पट अधिक दर लावण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. १५ हजारांचा कॅमेरा ४० हजारांत आणि एक लाखाचा कॅमेरा २.५० लाखांना दाखवला गेला आहे. हे दर अत्यंत अवास्तव असून यातील आर्थिक गणितांची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी लावून धरली. ​सुरक्षेचा मुद्दा केवळ कॅमेरे बसवण्यापुरता मर्यादित नसून डेटा स्टोरेज महत्त्वाचा असल्याचे लोकप्रतिनिधींनी निदर्शनास आणून दिले. अतिरिक्त आयुक्त बिपिन शर्मा यांनी पालिका मुख्यालयात एकूण ५६ कॅमेरे असून त्यातील ३० कॅमेरे सध्या कार्यरत नसल्याची कबुली दिली. निविदेतील अवास्तव दर आणि स्टोरेज क्षमतेवरून विरोधकांनी घेतलेले सर्व आक्षेप बाजूला ठेवत, स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी या प्रस्तावाला मंजुरी दिली.
​........
नव्या सीसीटीव्हीविषयी
​एकूण नवे कॅमेरे : ८७
​कंत्राटदार : मेसर्स सहोरा कॉर्पोरेशन
​कालावधी : ९ महिने (काम पूर्ण करणे)
परिसर : महापौर, आयुक्त कार्यालय, सभागृह, स्थायी समिती दालन, प्रवेशद्वार आणि कॉरिडोर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vidyanand Bapat: विद्यानंद बापट यांच्याविरोधात पोलिस तक्रार देणार; शिक्षणतज्ज्ञ धनंजय कुलकर्णींकडून 'नक्षली' असा उल्लेख

सायबर कॅफेतून सुरू झाला प्रवास, २७-२८ चित्रपटांचा अनुभव; आता रोहन शाह करणार निर्मितीची नवी सुरुवात

Champions Trophy Dates: भारतात महिला वर्ल्ड कपनंतर रंगणार चॅम्पियन्स ट्रॉफी! कधी अन् कोणत्या शहरात होणार सामने? ICC ची घोषणा

Mumbai ST Stop Demand: मुंबई-सातारा-कराड-कोल्हापूर एसटी बसला चेलाडी फाटा येथे अधिकृत थांबा देण्याची आमदार शंकर मांडेकर यांची परिवहन मंत्र्याकडे मागणी

पहिलीच मालिका हिट पण नंतर कुठे गायब झाली 'येऊ कशी तशी मी नांदायला'ची स्वीटू? करिअरच्या टॉपवर असतानाच घेतलेला मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT