महिला डब्यातून सुरक्षा रक्षक गायब
व्हायरल व्हिडिओनंतर होमगार्डवर कारवाई
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २ : मुंबई लोकलमधील महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून मध्यरात्री कल्याणकडे जाणाऱ्या लोकलमध्ये एकही सुरक्षा रक्षक नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका महिला प्रवाशाने इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करीत सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले होते. या प्रकरणाची दखल घेत लोहमार्ग पोलिसांनी चौकशी करून एका महिला होमगार्डवर शिस्तभंगाची कारवाई केली आहे.
संबंधित महिला प्रवासी रात्री ११.३० ते १२.३० वाजण्याच्या सुमारास कल्याणला जाणाऱ्या लोकलने प्रवास करीत होती. त्या वेळी संपूर्ण महिला डबा जवळपास रिकामा होता आणि डब्यात एकही पोलिस किंवा सुरक्षा रक्षक उपस्थित नव्हता. अशा परिस्थितीत एखादी अनोळखी व्यक्ती डब्यात चढली, तर एकट्या महिलेने काय करायचे, असा संतप्त सवाल तिने व्हिडिओतून उपस्थित केला आहे. तिच्या म्हणण्यानुसार, अशी वेळ तिच्यावर पाच-सहा वेळा आली. याबाबत तक्रार केल्यावर तिला पुरुषांच्या डब्यात जाण्याचा सल्ला देण्यात आला. काही सुरक्षा रक्षक कल्याणपर्यंत न जाता ठाकुर्ली स्थानकावरच उतरून जातात, असा आरोपही तिने केला होता. दरम्यान, याप्रकरणी एक महिला होमगार्ड दोषी आढळल्याने तिच्यावर शिस्तभंगाची कारवाई केल्याची माहिती लोहमार्ग पोलिसांनी दिली.
...
मोटरमन मदतीला
महिलेने मोटरमनकडे धाव घेत आपली व्यथा मांडली. मोटरमनने तातडीने अधिकाऱ्यांशी समन्वय साधून मदत मिळवून दिली. रात्री १२.३०ला गाडी कल्याणला पोहोचल्यावर तिच्यासोबत एक महिला कॉन्स्टेबल पाठवण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.