मुंबई

मंगल प्रभात लोढा यांचे आवाहन

CD

एक महापालिका शाळा
शिक्षणतज्ज्ञांनी दत्तक घ्यावी!
मंगलप्रभात लोढा यांचे आवाहन

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २ : शिक्षण क्षेत्रातील नामांकित संस्था, शाळा आणि शिक्षणतज्ज्ञांनी आपल्या परिसरातील किमान एक महापालिका शाळा दत्तक घेऊन तिच्या प्रगतीसाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन कौशल्य विकास व रोजगारमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी आज एका कार्यक्रमात केले.
शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांनी केवळ आपल्या संस्थेपुरते मर्यादित न राहता समाजाप्रती असलेली जबाबदारीही पार पाडली पाहिजे. आपल्या परिसरातील एखादी महापालिका शाळा निवडून तिच्या शैक्षणिक विकासासाठी योगदान द्यावे. विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रांतील ज्ञान मिळावे, यासाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळवून द्यावे आणि अत्याधुनिक शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून द्यावे. आर्थिक मदतीऐवजी आपल्या शाळेतील शिक्षकांनी महिन्यातून एकदा त्या शाळेला भेट देऊन चांगल्या शैक्षणिक व व्यवस्थापन पद्धती तेथे आणाव्यात, अशी भूमिका त्यांनी मांडली.
नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील कौशल्य विकासाच्या महत्त्वावरही लोढा यांनी विशेष भर दिला. विद्यार्थ्यांना लहान वयापासून विविध कौशल्यांचे शिक्षण मिळणे आवश्यक असून, त्यातून विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वासासोबतच श्रम आणि कष्ट करणाऱ्या व्यक्तींबद्दल आदर निर्माण होईल, असे त्यांनी सांगितले. भारतात श्रमाच्या (ब्लू-कॉलर) कामांविषयी असलेली सामाजिक मानसिकता बदलण्यासाठी कौशल्याधारित शिक्षण हा त्यासाठी महत्त्वाचा मार्ग असल्याचे त्यांनी नमूद केले.
---
शिक्षणव्यवस्था सक्षम करण्याचा प्रयत्न
भारताची शिक्षणव्यवस्था ही केवळ पुस्तकी ज्ञानावर आधारित नव्हती, तर कौशल्य, संस्कार, श्रमप्रतिष्ठा, संस्कृती आणि जीवनोपयोगी शिक्षणाची समृद्ध परंपरा भारतात पूर्वीपासून होती. ब्रिटिश राजवटीत ही पारंपरिक शिक्षणपद्धती मोडून काढत पाठांतर आणि नोकरीकेंद्री शिक्षणाला प्राधान्य देण्यात आले. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणलेल्या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातून भारतीय शिक्षणाच्या या समृद्ध परंपरेला आधुनिक कौशल्ये आणि तंत्रज्ञानाची जोड देत पुन्हा सक्षम करण्याचा प्रयत्न होत आहे, असा विश्वास लोढा यांनी व्यक्त केला.
---
‘ड्रग्ज फ्री मुंबई’साठी पुढाकार घ्यावा
विद्यार्थ्यांना व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी पालक, शिक्षक आणि समुपदेशकांनी एकत्र काम करावे आणि ‘ड्रग्ज फ्री मुंबई’ मोहिमेत राज्यातील शाळांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहनही लोढा यांनी या वेळी केले. प्रत्येक शाळेने दोन पालक, दोन शिक्षक आणि एका समाजसेवी संस्थेचे प्रतिनिधी अथवा समुपदेशकाचा समावेश असलेली छोटी समिती स्थापन करून विद्यार्थ्यांमध्ये लहान वयापासून व्यसनमुक्तीबाबत जागृती निर्माण करावी, अशी सूचना त्यांनी केली. ‘ड्रग्ज फ्री मुंबई’ हा केवळ शासनाचा उपक्रम न राहता शाळा, शिक्षक आणि पालकांनी मिळून उभारलेली सामाजिक चळवळ बनली पाहिजे, असे आवाहन लोढा यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange: सरकारकडून जरांगेंच्या मागण्या मान्य! प्रसाद लाड यांच्या हस्ते घेतलं पाणी, सलाईनही घेणार

Bidkin Bribe Case : टिपर सुरू ठेवण्यासाठी पोलिस हवालदाराची महिन्याला एक हजारांची मागणी; पोलिस हवालदारावर एसीबीच्या जाळ्यात

Maratha Quota Protest: मराठा आरक्षणासाठी मंगळवेढ्यात ठिय्या आंदोलन; तोडगा न निघाल्यास ४ सप्टेंबरला मंगळवेढा बंदची हाक

IPS Officers Transfer : पोलिस विभागात मोठा फेरबदल; ८ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या, 'या' सरकारचा तडकाफडकी निर्णय

'ऑपरेशन सिंदूर'चे नायक ते आता राम मंदिराचे नवे CEO, कोण आहेत निवृत्त एअर मार्शल जितेंद्र मिश्रा?

SCROLL FOR NEXT