दिव्यांग डब्यातील वादाचा प्रवाशांना फटका
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २ : दिव्यांगांसाठी राखीव डब्यात प्रवेशावरून झालेल्या वादाचा फटका बुधवारी (ता. २) सकाळच्या गर्दीच्या वेळेत लोकल सेवेला बसला. विरार-चर्चगेट जलद लोकलमध्ये बोरिवलीत आपत्कालीन साखळी ओढण्यात आल्याने ही लोकल चार मिनिटे थांबली. त्यानंतर अंधेरीत चौकशीसाठी आणखी सात मिनिटे ही गाडी खोळंबली. त्यामुळे एका डब्यातील वादाचा परिणाम लाखो प्रवाशांच्या लोकल प्रवासावर झाला. सकाळी ९.५६ वाजता विरारहून सुटलेली जलद लोकल १०.३३ वाजता बोरिवलीत पोहोचली. दिव्यांग डब्यात मूकबधिर प्रवाशाच्या प्रवेशावरून एका ज्येष्ठ प्रवाशासोबत वाद झाला. मूकबधिर प्रवाशासोबत आणखी एक व्यक्तीही दिव्यांग डब्यातून प्रवास करीत होती. वाद वाढल्यानंतर आपत्कालीन साखळी ओढण्यात आली आणि लोकल १०.३६ ते १०.४० या वेळेत बोरिवलीत थांबली. या घटनेची माहिती मिळताच ‘आरपीएफ’चे जवान दाखल झाले. चौकशीनंतर मूकबधिर प्रवाशासोबत असलेल्या व्यक्तीला खाली उतरवण्यात आले. आपत्कालीन साखळी ओढल्याप्रकरणी त्याच्याकडून दोन हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. मूकबधिर प्रवाशावर कोणतीही दंडात्मक कारवाई करण्यात आलेली नाही. यानंतर अंधेरी स्थानकात संबंधित ज्येष्ठ प्रवाशाची चौकशी करण्यात आली. त्यासाठी लोकलला आणखी सुमारे सात मिनिटे थांबावे लागले; मात्र चौकशीनंतरही त्याला लोकलमधून खाली उतरवण्यात आले नसल्याचा दावा सहप्रवाशांनी केला. या सगळ्या वादाचा फटका प्रवाशांना बसला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.