मुंबई

महालक्ष्मी रेसकोर्सवर १० झाडांचा बळी?

CD

महालक्ष्मी रेसकोर्सवर १० झाडांचा बळी?
ताडदेव पोलिसांत गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा
​मुंबई, ता. ३ : महालक्ष्मी रेसकोर्स येथील नामांकित मेसर्स रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब लिमिटेड प्रशासनाकडून नियम धाब्यावर बसवून वृक्षतोड करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महापालिकेची पूर्वसूचना न देता आणि परवानगीतील अटी-शर्तींचा भंग करून १० झाडे गायब केल्याप्रकरणी टर्फ क्लबचे अध्यक्ष आणि सचिवांविरोधात ताडदेव पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महापालिकेच्या जी साउथ वॉर्डातील कनिष्ठ झाड अधिकारी संतोष भेट्टी यांनी ताडदेव पोलिस ठाण्यात ही तक्रार नोंदवली आहे. महापालिकेने टर्फ क्लबला दिलेल्या परवानगीनुसार,​ १३ झाडे कापण्यास परवानगी होती, तर ​१२ झाडे दुसऱ्या ठिकाणी पुनर्रोपित करायची होती आणि ​४३ झाडे आहे त्याच जागेवर सुरक्षित ठेवणे बंधनकारक होते; ​मात्र ११ ऑगस्टला बीएमसी अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली असता, आहे त्या जागेवर सुरक्षित ठेवायच्या ४३ झाडांपैकी आठ झाडे आणि पुनर्रोपणास परवानगी दिलेल्यांपैकी दोन झाडे (एकूण १० झाडे) त्या ठिकाणी आढळूनच आली नाहीत. कोणतीही माहिती न देता झाडांची कत्तल करण्यात आल्याचे पाहणीत उघड झाले. महापालिकेने १४ ऑगस्टला टर्फ क्लबला कारणे दाखवा नोटीस बजावून स्पष्टीकरण मागितले होते. ​महापालिकेच्या तक्रारीवरून ताडदेव पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून अधिक तपास सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manchar News : डिंभे धरण ९९.८ टक्के भरले तरी उजवा कालवा कोरडा; आंबेगाव आणि शिरूर तालुक्यांतील पिके पाण्याअभावी करपली

Saudi Execution: मक्केतील फाशीच्या प्रकरणाला नवे वळण; सोशल मीडियावर आरोपांची राळ; भारतीय व्यक्तीचा का होतोय उल्लेख?

Latest Marathi News Live Update : 'हा' तर शिंदेंना गोत्यात आणण्याचा डाव; गुलाबराव पाटीलांनी केली ऑडिओ क्लिपच्या SIT चौकशीची मागणी

ED Raid : अवैध स्त्रीबीज खरेदी-विक्री रॅकेटप्रकरणी बारामती, ठाणे आणि नाशिकमध्ये ईडीचे छापे; २९ लाखांची रोकड जप्त

Ration Card e-KYC: रेशनकार्डधारकांसाठी महत्त्वाची बातमी! आता घरबसल्या करता येणार ई-केवायसी; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

SCROLL FOR NEXT