एफडीएच्या प्रयोगशाळेची क्षमता वाढली
मुंबई, ता. ३ : अन्न व औषध प्रशासनाच्या प्रयोगशाळांच्या कामगिरीत वाढ झाली असून, गेल्या तीन महिन्यांच्या आकडेवारीत ते स्पष्ट होत आहे. जून ते ऑगस्ट २०२६ या तीन महिन्यांत अन्न व औषध प्रशासनाने अन्नपदार्थ आणि औषधांचे तब्बल ३७ हजार ६०४ नमुने संकलित केले. त्यापैकी ३२ हजार ६०४ नमुन्यांची तपासणी पूर्ण झाली असून, तपासलेल्या नमुन्यांपैकी १५ हजार २६८ नमुने निर्धारित दर्जाचे नसल्याचे आढळून आले आहे.
अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी प्रयोगशाळांच्या गेल्या तीन महिन्यांच्या कामगिरीची माहिती देताना ही आकडेवारी जाहीर केली. या कालावधीत संकलित केलेल्या नमुन्यांमध्ये ३४ हजार ५८४ अन्नपदार्थांचे आणि तीन हजार २० औषधांचे नमुने होते. तपासलेल्या नमुन्यांमध्ये ३० हजार ४९२ अन्नपदार्थांचे आणि दोन हजार ११२ औषधांचे नमुने होते. तपासलेल्या एकूण ३२ हजार ६०४ नमुन्यांपैकी १७ हजार ३३६ नमुने निर्धारित दर्जाचे आढळले, तर १५ हजार २६८ नमुने निर्धारित दर्जाचे नसल्याचे स्पष्ट झाले. निर्धारित दर्जाचे नसलेल्या नमुन्यांमध्ये असुरक्षित, निकृष्ट दर्जाची किंवा चुकीची माहिती असलेली उत्पादने असू शकतात. औषधांच्या तपासणीत आठ नमुने बनावट असल्याचेही आढळले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.