मुंबई

मुंबई-सावंतवाडी एक्स्प्रेसचे उद्‍घाटन

CD

मुंबई-सावंतवाडी एक्स्प्रेसचे उद्‍घाटन
ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गातील प्रवाशांना फायदा

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३ : मुंबई आणि कोकणदरम्यानचा रेल्वे प्रवास अधिक सुलभ करणाऱ्या सीएसएमटी-सावंतवाडी रोड एक्स्प्रेसचे आज उद्‍घाटन करण्यात आले. मुंबई आणि कोकणाला जोडणारी ही नवी सेवा ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातील प्रवाशांसाठी महत्त्वाची ठरणार असून, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांना आणखी एक रेल्वे पर्याय उपलब्ध होणार आहे.
गाडी क्रमांक ०१००१ सीएसएमटी-सावंतवाडी रोड एक्स्प्रेसला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि मत्स्यव्यवसाय व बंदरे विकासमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत हिरवा झेंडा दाखवण्यात आला. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री पीयूष गोयल हे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे कार्यक्रमात सहभागी झाले. सुमारे ५१० किलोमीटरचा प्रवास करणाऱ्या या सेवेला दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि सावंतवाडी रोडसह प्रमुख स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत. दरम्यान, गणेशोत्सवातील गर्दी लक्षात घेऊन यंदा ३५० विशेष गाड्या चालविण्यात येत असून, गरजेनुसार ही संख्या ३७०पर्यंत वाढविण्याची तयारी असल्याचे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले.
...
रात्री मुंबईतून, दुपारी सावंतवाडीत
नियमित सेवेत गाडी क्रमांक १५०८७ सीएसएमटी-सावंतवाडी रोड एक्स्प्रेस सीएसएमटीहून रात्री ११.५५ वाजता सुटून दुसऱ्या दिवशी दुपारी २.१५ वाजता सावंतवाडी रोडला पोहोचेल. परतीची १५०८८ सावंतवाडी रोड-सीएसएमटी एक्स्प्रेस सायंकाळी ५.२० वाजता सावंतवाडी रोडहून सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी ६.४० वाजता सीएसएमटीला पोहोचेल.
...
आरक्षणाची प्रतीक्षा
गाडीचे नियमित प्रवासी आरक्षण उपलब्ध नसल्याने ती जवळपास रिकामीच सावंतवाडीच्या दिशेने रवाना झाली. गणेशोत्सवाच्या तोंडावर जनशताब्दी, मांडवी, तुतारी आणि कोकणकन्या यांसारख्या गाड्यांचे आरक्षण फुल्ल असताना नव्या गाडीचा प्रवाशांना लाभ घेता आला नाही. नियमित ट्रेन क्रमांक १५०८७-१५०८८ सेवा नेमकी कधीपासून सुरू होणार आणि तिचे आरक्षण कधी खुले होणार, याबाबत मध्य रेल्वेने अद्याप स्पष्ट माहिती दिलेली नसल्याने प्रवाशांची प्रतीक्षा कायम आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Illegal Road Block: ९ कोटींच्या डांबरी रस्त्यावर बेकायदेशीर माती-दगडांचे ढिगारे; दुचाकीस्वार गंभीर जखमी, पीएमआरडीए निष्क्रिय

Maratha Reservation : मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा; कार्यकर्त्यांनी अंगावर पेट्रोल ओतून घेतले, दीड तास रास्ता रोको

Marathi News Live Updates: जरांगे पाटलांच्या शिष्टमंडळासोबत सरकारच्या प्रतिनिधींची चर्चा

रोहित शर्माचे भवितव्य ते अजित आगरकरांची गैरहजेरी... BCCI च्या Meeting मध्ये नेमकं काय घडलं?

अय्यो! टॉक्सिल'ला मागे टाकणाऱ्या 'हनुमान अंश'मध्ये झळकतेय मराठमोळी अभिनेत्री; सध्या स्टार प्रवाहवर करतेय काम, कोण आहे ती?

SCROLL FOR NEXT