ऑर्किड सिटी सेंटर मॉलवर कारवाई
‘सर्वोच्च’ आदेशानंतर रिकामा करण्याचे निर्देश
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३ : मुंबई सेंट्रल येथील बेलासिस मार्गावरील प्रसिद्ध ऑर्किड सिटी सेंटर मॉलप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या कठोर आदेशांनंतर महापालिकेने कारवाई सुरू केली आहे. मॉलची इमारत पूर्णपणे रिकामी करण्यासाठी महापालिकेने मालक, विकसक आणि दुकानदारांना संयुक्त नोटीस बजावली आहे. तसेच सक्षम प्राधिकरणाची परवानगी मिळेपर्यंत मॉलमध्ये प्रवेश करण्यास आणि वापर करण्यास बंदी घालण्यात आली आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी महापालिकेच्या ‘डी’ विभागाच्या वतीने नुकतीच एक समन्वय बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस महापालिका अधिकारी, नागपाडा पोलिस ठाण्याचे प्रतिनिधी, ‘बेस्ट’ उपक्रम आणि मॉलचे प्रतिनिधी उपस्थित होते. न्यायालयाच्या आदेशांचे स्वेच्छेने व तत्काळ पालन करण्याच्या सूचना मॉल प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. ऑर्किड सिटी सेंटर मॉलला २०२०मध्ये भीषण आग लागली होती. याप्रकरणी २५ ऑगस्ट २०२६ रोजी सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट निर्देश दिले आहेत. इमारतीची विकसकाकडून सर्व बाजूंनी पूर्ण दुरुस्ती होत नाही, तोपर्यंत ती वापरात आणता येणार नाही. इमारत सर्व मजल्यांसह सुरक्षित असल्याचे आणि सर्व वैधानिक अटींची पूर्तता करीत असल्याचे महापालिकेचे समाधान होत नाही, तोपर्यंत वापर पूर्णपणे बंद राहील. मॉलची इमारत पूर्णतः सील ठेवून कोणालाही प्रवेश दिला जाऊ नये, असे सांगण्यात आले आहे.
...
वीज, पाणी खंडित
न्यायालयाच्या आदेशानुसार महापालिकेचे इमारत व कारखाना विभाग, इमारत प्रस्ताव विभाग आणि मुंबई अग्निशमन दल संयुक्त कारवाई करीत आहेत. या कारवाईचा भाग म्हणून मॉलचा पाणीपुरवठा खंडित करण्यात आला आहे. बांधकामासाठी लागणारी आवश्यक वीज वगळून उर्वरित वीजपुरवठा खंडित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.