करमतारा इंजिनिअरिंगचा आयपीओ
मुंबई, ता. ४ : पवनचक्क्यांचे टॉवर, अँगल टॉवर, वीज वितरण वाहिन्यांसाठीचे टॉवर आणि सौरऊर्जा ट्रॅकरचे विविध भाग बनविणाऱ्या करमतारा इंजिनिअरिंगच्या आयपीओसाठी २४१ ते २५४ रुपये किंमतपट्टा निश्चित करण्यात आला आहे.
सुमारे ८७५ कोटी रुपयांच्या या आयपीओमध्ये ९ ते ११ सप्टेंबरदरम्यान गुंतवणूक करता येणार आहे. कंपनीच्या शेअरची बाजारात नोंदणी १७ सप्टेंबरला होण्याची शक्यता आहे. आयपीओतून मिळणारी रक्कम कर्जफेड आणि उत्पादन क्षमता वाढविण्यासाठी वापरण्यात येणार असल्याचे राजीव सिंह यांनी सांगितले. कंपनीचा यंदाचा महसूल सुमारे ४,३०० कोटी रुपये आहे.
करमतारा इंजिनिअरिंग ही सौरऊर्जा पॅनेलच्या ट्रॅकरचे देशातील सर्वात मोठे उत्पादक असल्याचा कंपनीचा दावा आहे. ऊर्जा क्षेत्रासाठी लागणाऱ्या उपकरणांचे विविध भाग कंपनी तयार करते. कच्च्या मालाचे उत्पादनही कंपनी स्वतः करीत असल्याने उत्पादनाची गुणवत्ता राखण्याबरोबरच खर्च कमी करण्यास मदत होते. त्यामुळे कंपनीच्या नफ्यात वाढ होण्यास हातभार लागतो.
कंपनीचे तारापूर, नागपूर आणि गुजरातमधील भचाऊ येथे उत्पादन प्रकल्प आहेत. इटलीतही कंपनीचा प्रकल्प असून सौदी अरेबियातील प्रकल्प लवकरच सुरू होणार आहे. युरोप, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, अमेरिका आणि दक्षिण अमेरिका यांसह ५० देशांमध्ये कंपनीचे ग्राहक आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.