मुंबई

सीईटीच्या गुणपत्रिकेत फेरफार केलेल्या विद्यार्थ्याचा उच्च न्यायालयाने केला प्रवेश रद्द

CD

‘त्या’ विद्यार्थ्याचा प्रवेश रद्द
सीईटीच्या गुणपत्रिकेत फेरफार

मुंबई, ता. ४ : एका विद्यार्थ्याने सीईटीच्या गुणपत्रिकेत फेरफार करून पुण्यातील एका शैक्षणिक संस्थेत अभियांत्रिकी शाखेत प्रवेश घेण्याचा प्रयत्न केला. या विद्यापीठाला ती गुणपत्रिका संशयास्पद जाणवल्याने त्यांनी या विद्यार्थ्याचा प्रवेश रद्द केला. यावर या विद्यार्थ्याने विसंगतीपूर्ण असलेली ही गुणपत्रिका ही सीईटीच्या संकेतस्थळावरून डाऊनलोड करून घेतली, असा दावा करून सीईटी विरुद्ध उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती; परंतु सीईटी कक्षाने उच्च न्यायालयात त्या विद्यार्थ्याचे दोन्ही सीईटी परीक्षा निकालाचे सर्व मूळ रेकॉर्ड सादर करून विद्यार्थ्याने न्यायालयात व या विद्यापीठात दाखल केलेल्या गुणपत्रिकेत फेरफार केल्याचे न्यायालयाच्या निदर्शनात आणून दिले. यावर उच्च न्यायालयाचे न्या. फरहान पी. दुबाश व न्या. आर. आय. छागला यांनी शिक्कामोर्तब करून त्या विद्यार्थ्याचा प्रवेश रद्द करून त्याची याचिका फेटाळली व या विद्यार्थ्याने मिळविलेला प्रवेश मुंबई उच्च न्यायालयाने रद्द केला.

न्यायालयाचे निरीक्षण
या प्रकरणाबाबत निर्णय देताना न्यायालय निरीक्षण करताना म्हणाले, ‘गुणवत्ता ठरवण्यासाठी आणि शिक्षणाच्या मर्यादित संधींचे वाटप करण्यासाठी घेतली जाणारी परीक्षा ही अनिवार्यपणे परीक्षा प्रक्रियेची सचोटी आणि उमेदवारांनी सादर केलेल्या दस्तऐवजांची सत्यता यावर अवलंबून असते. गुण, पर्सेंटाइल किंवा गुणपत्रिकांमध्ये फेरफार करण्याचा कोणताही प्रयत्न, त्या प्रक्रियेच्या मूळ पायावरच घाला घालतो. हे विशेषतः दुर्दैवी आहे. जेव्हा असे वर्तन व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशाच्या संदर्भात घडते, जिथे शिक्षणाची संधी मिळवण्यासाठी गुणवत्ता हाच एकमेव आधार असणे अपेक्षित असते.’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Sooryavanshi साठी BCCI चा मास्टरप्लान! सचिवांचा खुलासा, 'तो केवळ एका सीझनचा स्टार राहू नये...'

Marathi News Live Updates : भारतीय लष्करातील जवानांनी घेतलं पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ गणपतीचे दर्शन

DWIDHA MOVIE REVIEW: वडील आणि मुलीच्या नात्यातील भावनिक गुंतागुंत दाखवणारा, मनाला भिडणारा चित्रपट ‘द्विधा’

Vastu Tips: संध्याकाळ होण्यापूर्वी घरात करा ‘ही’ ३ कामं; घरात राहील सुख-समृद्धी आणि सकारात्मक वातावरण!

Jintur News : जिंतूर तालुका कोरडा दुष्काळग्रस्त जाहीर करा; माजी आमदार विजय भांबळे

SCROLL FOR NEXT