मुंबई

राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानातील १,२०० कर्मचारी बेमुदत संपावर

CD

राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानातील १,२०० कर्मचारी बेमुदत संपावर
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ४ : राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानांतर्गत मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागात कार्यरत सुमारे १,२०० कंत्राटी कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी आझाद मैदानात गेल्या पाच दिवसांपासून बेमुदत आंदोलन सुरू केले आहे. १० वर्षांपासून सेवा बजावूनही सेवेत समावेशन, वेतनवाढ आणि अन्य कर्मचारी सुविधांपासून वंचित असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे.
या अभियानांतर्गत वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, सहाय्यक परिचारिका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषधनिर्माते, माहिती नोंदणी कर्मचारी, समाज कार्यकर्ते आणि परिचर अशा विविध पदांवर कर्मचारी कार्यरत आहेत. बहुतांश कर्मचारी २०१६ पासून सेवा देत असून, कोरोना महामारीच्या काळातही त्यांनी काम केले. दरम्यान, १० वर्षे पूर्ण होऊनही त्यांना महापालिका सेवेत समाविष्ट करण्यात आलेले नाही, असे पालिका दवाखान्याचे डेटा एंट्री ऑपरेटर प्रवीण चव्हाण यांनी सांगितले.
कर्मचाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, अनेकांना १८ ते २० हजार रुपयांच्या आसपास वेतन मिळते. गेल्या अनेक वर्षांत वेतनवाढ झालेली नाही. महिला कर्मचाऱ्यांना भरपगारी प्रसूती रजा मिळत नसून, बोनस आणि नियमानुसार सुट्ट्याही मिळत नसल्याची तक्रार आहे. कायमस्वरूपी व कंत्राटी कर्मचाऱ्यांमधील भेदभावामुळे मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत असल्याचेही गिरीश सुर्वे यांनी सांगितले.
कंत्राटदाराकडून नोकरीवर रुजू होताना काही कर्मचाऱ्यांकडून पाच हजार रुपये घेतले जात असल्याचा तसेच प्रसूती रजेच्या काळातही पैसे घेतल्याचा गंभीर आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
आंदोलनाचा परिणाम मुंबईतील आरोग्यसेवेवर झाला आहे. गेल्या पाच दिवसांपासून बाह्यरुग्ण विभाग, बालकांचे लसीकरण, मलेरिया व डेंग्यू तपासणी, एचआयव्ही चाचण्या, कुटुंब नियोजन सेवा, संसर्गजन्य आजारांवरील काम तसेच गर्भवती महिलांची नोंदणी आणि आरोग्यविषयक संगणकीय नोंदींचे काम प्रभावित झाल्याचा दावा कर्मचाऱ्यांनी केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबईतील सर्वात श्रीमंत बाप्पा! GSB सेवा मंडळाच्या गणपतीला ७०३ कोटी रुपयांचे विमा संरक्षण

Pune Festival : पुणे फेस्टिव्हलचे १८ सप्टेंबरला उपराष्ट्रपतींच्या हस्ते उद्घाटन

Pune News : संच मान्यतेचे प्रचलित निकष कायम ठेवण्याच्या मागणीसाठी पुण्यात शिक्षकांचा मोर्चा

Marathi News Live Updates : गणेशोत्सवाची तुलना थेट दहशतवादी संघटनेशी करणं चुकीचं, विद्यानंद बापट विरोधात पतित पवन संघटना आक्रमक

Tejas Express: तेजसच्या प्रवासात मोदकांचा गोडवा! गणेशोत्सवात भाविकांसाठी आयआरसीटीसीची खास मेजवानी

SCROLL FOR NEXT