तिन्ही मार्गांवर रविवारी मेगाब्लॉक
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ४ : उपनगरी रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती तसेच सिग्नल यंत्रणेत काही तांत्रिक कामे करण्यासाठी रविवारी (ता. ६) तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या सीएसएमटी ते विद्याविहार अप-डाऊन धीम्या मार्गावर तर हार्बर मार्गावरील सीएसएमटी-चुनाभट्टी/वांद्रे अप आणि डाऊन मार्गावर आणि पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट ते मुंबई सेट्रल अप-डाऊन जलद मार्गावर घेण्यात येणार आहे.
मध्य रेल्वे -
कुठे - सीएसएमटी-विद्याविहार अप-डाऊन धीम्या मार्गावर
कधी - सकाळी १०.५५ ते दुपारी ३.५५
परिणाम - सीएसएमटी येथून सुटणाऱ्या धीम्या मार्गावरील सेवा सीएसएमटी ते विद्याविहार स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील. भायखळा, परळ, दादर, माटुंगा, शीव आणि कुर्ला स्थानकांदरम्यान थांबून विद्याविहार स्थानकावर डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. घाटकोपर येथून सुटणाऱ्या अप धीम्या मार्गावरील सेवा विद्याविहार ते सीएसएमटी स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येतील. कुर्ला, शीव, माटुंगा, दादर, परळ आणि भायखळा स्थानकांवर थांबतील.
हार्बर रेल्वे
कुठे - सीएसएमटी-चुनाभट्टी/वांद्रे अप आणि डाऊन मार्गावर
कधी - सकाळी ११.१० ते दुपारी ४.४०
परिणाम - सीएसएमटी/वडाळा येथून वाशी/बेलापूर/पनवेलकरिता सुटणारी डाऊन हार्बर मार्गावरील सेवा आणि वांद्रे/गोरेगाव येथून सीएसएमटीसाठी डाऊन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहणार आहे. तर, पनवेल/बेलापूर/वाशी येथून सीएसएमटीकरिता सुटणारी अप हार्बर मार्गावरील सेवा आणि गोरेगाव/वांद्रे येथून सीएसएमटी सुटणारी अप हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील. पनवेल आणि कुर्ला (प्लॅटफॉर्म क्र. ८) दरम्यान विशेष सेवा २० मिनिटाने चालवल्या जातील.
.......
पश्चिम रेल्वे
कुठे - चर्चगेट ते मुंबई सेंट्रलदरम्यान अप-डाऊन जलद मार्गावर
कधी - सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५
परिणाम - चर्चगेट ते मुंबई सेंट्रलदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावरील सर्व लोकल सेवा धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. त्यामुळे काही अप-डाऊन उपनगरीय सेवा रद्द राहतील. तसेच चर्चगेटकडे जाणाऱ्या काही लोकल सेवा वांद्रे किंवा दादर स्थानकापर्यंतच चालवून तेथूनच परतीच्या दिशेने रवाना करण्यात येतील.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.