मुंबई

सेंच्युरी मिलच्या जमीन विकसकास देण्यास विरोध

CD

सेंच्युरी मिलची जमीन विकसकास देण्यास विरोध
काँग्रेसचा पालिकेवर घणाघात

सकाळ वृत्तसेवा
​मुंबई, ता. ५ : लोअर परळ येथील ऐतिहासिक सेंच्युरी मिलची ६.१७ एकर जमीन ३० वर्षांच्या भाडेपट्ट्याने खासगी विकसकाला देण्याच्या पालिकेच्या प्रस्तावावर तीव्र संताप व्यक्त होत आहे. महापालिकेतील काँग्रेस गटनेते अशरफ आझमी यांनी या प्रस्तावाला जोरदार विरोध करीत पालिकेवर सुमारे १० हजार कोटींचा फायदा खासगी विकसकाच्या घशात घालण्याचा गंभीर आरोप केला आहे.
पत्रकार परिषदेत बोलताना अशरफ आझमी म्हणाले, ‘‘लोअर परळमधील या २.७ लाख चौ. फूट जमिनीवर विकसकाला ५ एफएसआय दिला जात आहे. त्यामुळे तब्बल १३ लाख चौ. फूट बांधकाम क्षमता निर्माण होते. प्रति चौ. फूट एक लाख दर गृहीत धरल्यास यात १३,००० कोटींचा नफा आहे. असे असताना महापालिकेला केवळ १,३०० कोटी मिळणार आहेत. मग उर्वरित १०,००० कोटींचा फायदा नेमका कोणाला होणार आहे, हे पालिकेने हे स्पष्ट करावे.’’ ‘‘सर्वोच्च न्यायालयात तब्बल ७० वर्षे कायदेशीर लढा देऊन जानेवारी २०२५ मध्ये ही जमीन पालिकेच्या ताब्यात आली आहे. ज्या जमिनीचा मूळ उद्देश गरीब आणि गिरणी कामगारांना निवारा देणे हा होता, ती मौल्यवान संपत्ती आता खासगी विकसकाच्या हवाली केली जात आहे. ज्या गिरणी कामगारांनी मुंबई घडवली, त्यांनाच बेघर करून मुंबईबाहेर ढकलण्याचा हा प्रयत्न खपवून घेतला जाणार नाही. ‘आधी पुनर्वसन, मगच विकास’ हेच आमचे धोरण आहे,’’ असा इशारा आझमी यांनी दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dahi Handi Accident Mumbai : मुंबईत दहीहंडी उत्सवाला गालबोट; ७ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू, दोरी बांधलेला विटांचा कॉलम कोसळला

ऑनलाइन Grocery खरेदी करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, काय बदलणार?

DA Hike: सरकारी कर्मचाऱ्यांना जन्माष्टमीची भेट! महागाई भत्त्यात ६० टक्के वाढ, सरकार मोठा निर्णय घेणार

Marathi News Live Updates: पंतप्रधानांचा फोटो काढल्याप्रकरणी मनसेचे आशिष साबळे प्रशांत कनोजिया, विक्रांत कनोजियांना जामीन मंजूर

झीरम घाटी नक्षलवादी हल्ला प्रकरणात NIA कोर्टाने १० आरोपींना ठरवलं दोषी; छत्तीसगड काँग्रेसच्या सर्व बड्या नेत्यांचं हत्याकांड प्रकरण

SCROLL FOR NEXT