नोवोनेसिसची महाराष्ट्रात सहा हजार कोटींची गुंतवणूक
मुंबई, ता. ५ : बायोसोल्यूशन्स क्षेत्रातील नोवोनेसिस कंपनी पाताळगंगा येथील प्रकल्पाचा विस्तार करणार असून, त्यासाठी सहा हजार ६६० कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक केली जाणार आहे. या विस्तारातून जगातील अत्याधुनिक एन्झाइम उत्पादन केंद्रांपैकी एक केंद्र उभारण्यात येणार आहे. हा प्रकल्प २०३०पर्यंत पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होण्याची शक्यता आहे.
पाताळगंगा येथील केंद्रात बायोफ्युएल्स, घरगुती देखभाल उत्पादने तसेच अन्न व पेय उद्योगासाठी आवश्यक एन्झाइम्सचे उत्पादन केले जाणार आहे. कंपनीच्या बायोसोल्यूशन्सना जगभरातून वाढत असलेली मागणी पूर्ण करण्यासाठी या विस्ताराचा उपयोग होणार आहे, असे नोवोनेसिसचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी एस्टर बायगेट यांनी सांगितले.
हे अत्याधुनिक उत्पादन केंद्र कंपनीच्या जागतिक उत्पादन व्यवस्थेचा महत्त्वाचा भाग असेल. त्यातून पश्चिम आशिया, आफ्रिका, भारत आणि दक्षिण आशियातील ग्राहकांशी कंपनीची जवळीक वाढण्यास मदत होईल. पाताळगंगा प्रकल्प हा कंपनीच्या जागतिक स्तरावरील विस्तार योजनेतील महत्त्वाचा टप्पा आहे. या योजनेअंतर्गत रायॉन्ग (थायलंड), फ्रँकलिन्टन (नॉर्थ कॅरोलिना), तायकांग (चीन), अराउकारिया (ब्राझील) आणि वेस्ट ॲलिस (विस्कॉन्सिन) येथील प्रकल्पांचाही विस्तार करण्यात आला आहे.
-------
भारताच्या वाढत्या बायोइकॉनॉमीला ही गुंतवणूक गती देण्यासाठी महत्त्वाची ठरेल. ‘बायो ई-३’ धोरणाच्या माध्यमातून भारत सरकारने बायोसोल्यूशन्सच्या आर्थिक, सामाजिक आणि पर्यावरणीय फायद्यांचा प्रभावी वापर करण्याच्या दिशेने महत्त्वाची वाटचाल सुरू केली आहे. आत्मनिर्भर आणि नेट-झीरो कार्बनचे भविष्य घडविण्यात हे धोरण महत्त्वाची भूमिका बजावू शकते.
- कृष्ण मोहन पुव्वाडा, अध्यक्ष, पश्चिम आशिया, भारत व आफ्रिका विभाग, नोवोनेसिस
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.