मुंबई

एसटीच्या उत्पन्नात ६६ कोटींची वाढ

CD

एसटीच्या उत्पन्नात ६६ कोटींची वाढ
नियोजनाचा सकारात्मक परिणाम

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ५ : एसटी महामंडळाच्या उत्पन्नात ऑगस्टमध्ये एसटीच्या उत्पन्नात तब्बल ६६ कोटी रुपयांची वाढ झाली आहे. ग्रामीण तसेच निमशहरी भागातील दररोज प्रवास करणारे नोकरदार, शेतकरी, महिला, विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि ज्येष्ठ नागरिक यांच्या प्रवासाच्या वेळा लक्षात घेऊन बसफेऱ्यांचे नियोजन करण्यात आले. त्याचबरोबर आठवडा बाजार, यात्रा-जत्रा तसेच स्थानिक गर्दीचे दिवस लक्षात घेऊन संबंधित मार्गांवर अतिरिक्त फेऱ्याही वाढविण्यात आल्या. त्याचा हा परिणाम आहे.
एसटीच्या एकूण प्रवाशांपैकी तब्बल ८५ टक्क्यांहून अधिक प्रवासी १०० किलोमीटरच्या आतील अंतरात प्रवास करतात. त्यामुळे प्रत्येक आगाराने आपल्या कार्यक्षेत्रातील प्रवाशांची गरज ओळखून त्यानुसार वाहतूक नियोजन करणे आवश्यक होते; मात्र गेल्या काही वर्षांत याकडे अपेक्षित लक्ष न देता लांब पल्ल्याच्या, तुलनेने अनुत्पादक फेऱ्यांवर अधिक भर दिला जात होता. त्यामुळे प्रवासी संख्या आणि उत्पन्नाच्या तुलनेत खर्च अधिक होऊन एसटीच्या तोट्यात भर पडत होती. मागील महिन्यात उत्पन्नवाढीचा आढावा घेताना मंत्री सरनाईक यांनी ही बाब निदर्शनास आणून दिली होती. त्यानंतर ऑगस्ट महिन्यापासून प्रत्येक आगाराने प्रवाशांची प्रत्यक्ष उपलब्धता आणि प्रवासाची मागणी लक्षात घेऊन वेळापत्रकात आवश्यक बदल करण्यास सुरुवात केली. प्रवासी उपलब्ध असलेल्या मार्गांवर अधिक फेऱ्या चालविणे, हेच उत्पन्नवाढीचे प्रभावी सूत्र आहे, असे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले.
...
३१ ऑगस्टला विक्रमी उत्पन्न
विविध उपाययोजनांसह रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर ३१ ऑगस्टला एसटीला आतापर्यंतचे सर्वाधिक दैनंदिन उत्पन्न मिळाले. एका दिवसात तब्बल ४५ कोटी रुपयांची तिकीट विक्री झाली. एसटीला दररोज सरासरी ३४ ते ३५ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळते. त्या तुलनेत ३१ ऑगस्टला एका दिवसात सुमारे १० कोटी रुपयांची वाढ झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dahi Handi Accident Mumbai : मुंबईत दहीहंडी उत्सवाला गालबोट; ७ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू, दोरी बांधलेला विटांचा कॉलम कोसळला

ऑनलाइन Grocery खरेदी करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, काय बदलणार?

DA Hike: सरकारी कर्मचाऱ्यांना जन्माष्टमीची भेट! महागाई भत्त्यात ६० टक्के वाढ, सरकार मोठा निर्णय घेणार

Marathi News Live Updates: पंतप्रधानांचा फोटो काढल्याप्रकरणी मनसेचे आशिष साबळे प्रशांत कनोजिया, विक्रांत कनोजियांना जामीन मंजूर

झीरम घाटी नक्षलवादी हल्ला प्रकरणात NIA कोर्टाने १० आरोपींना ठरवलं दोषी; छत्तीसगड काँग्रेसच्या सर्व बड्या नेत्यांचं हत्याकांड प्रकरण

SCROLL FOR NEXT