टिटवाळा मेगाब्लॉकवर संताप
विश्वासात न घेतल्याचा प्रवासी संघटनांचा आरोप
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ५ : टिटवाळा स्थानकाच्या विस्तारीकरणासाठी मध्य रेल्वेने जाहीर केलेल्या १५ दिवसांच्या मेगाब्लॉकवरून प्रवासी संघटना आक्रमक झाल्या आहेत. एवढ्या मोठ्या ब्लॉकपूर्वी प्रवासी संघटनांना विश्वासात घेतले नाही. तसेच पर्यायी वाहतुकीचे पुरेसे नियोजन करण्यात आले नसल्याचा आरोप कल्याण-कसारा-कर्जत रेल्वे प्रवासी संघटनेने केला आहे.
सुरुवातीला रात्रीच्या वेळेत ब्लॉकचे नियोजन करण्यात आले होते; मात्र दिवसा आणि रात्री ब्लॉक सुरू असल्याने टिटवाळा ते कसारा मार्गावरील प्रवाशांच्या अडचणी वाढल्या आहेत. काही लोकल फेऱ्या पूर्वसूचना न देता रद्द होत असताना मेल-एक्स्प्रेस गाड्यांना मार्ग दिला जात असल्याने प्रवाशांमध्ये नाराजी आहे. ब्लॉकपूर्वी प्रवासी संघटनांची बैठक घेऊन लोकलचे वेळापत्रक, रद्द होणाऱ्या फेऱ्या आणि पर्यायी बससेवेचे नियोजन करणे अपेक्षित होते; मात्र प्रशासनाने एकतर्फी निर्णय घेतल्याने प्रवाशांना ऐनवेळी बदलांना सामोरे जावे लागत असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.
जनआंदोलनाचा इशारा
रेल्वे प्रशासनाने तातडीने सर्व प्रवासी संघटनांची संयुक्त बैठक घेऊन उर्वरित कालावधीसाठी योग्य नियोजन करावे, अशी मागणी संघटनेचे अध्यक्ष राजेश घनघाव यांनी केली. पूर्वसूचना न देता लोकल रद्द करण्याचा प्रकार सुरू राहिल्यास प्रवाशांच्या वतीने मोठे जनआंदोलन उभारण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.