मुंबई

थरांचा थरार अन् सेलिब्रिटींच ग्लॅमर; मुंबईच्या दहीहंड्यांवर बॉलिवूडसह मराठी सेलिब्रिटींची मोहोर!

CD

...अन् सेलिब्रिटींचा ग्लॅमर
मुंबईच्या दहीहंड्यांवर बॉलीवूडसह मराठी सेलिब्रिटींची मोहर

सकाळ वृत्तसेवा
​मुंबई, ता. ५ : ‘गोविंदा आला रे आला’च्या जयघोषात एकीकडे उंचच उंच मानवी मनोरे रचण्याचा थरार सुरू असताना, दुसरीकडे बॉलीवूड आणि मराठी चित्रपटसृष्टीतील तारे-तारकांच्या उपस्थितीने यंदाच्या मुंबईतील दहीहंडी उत्सवाला भव्यता प्राप्त करून दिली. गोविंदा पथकांच्या नऊ-दहा थरांच्या साहसासोबतच रंगमंचावर अवतरलेल्या सेलिब्रिटींच्या झगमगाटाने मुंबईकरांचे डोळे दीपवून टाकले.
​यंदा उपनगरांमधील नामांकित दहीहंडी महोत्सवांमध्ये स्टारडमची विशेष उपस्थिती लक्षणी ठरली. आमदार राम कदम आयोजित घाटकोपर येथील दहीहंडीच्या मंचावर लोकप्रिय नृत्यांगना गौतमी पाटील हिच्या आगमनाने उपस्थितांमध्ये मोठा उत्साह संचारला. तिच्या खास अदा आणि नृत्याने पारंपरिक उत्सवात मनोरंजनाचा अनोखा संगम पाहायला मिळाला. ​घाटकोपर पश्चिम येथील ‘सन्मान दहीहंडी’मध्ये अभिनेत्री अमृता खानविलकर, बॉलीवूड अभिनेता आफताब शिवदासानी, सोनल चौहान, श्वेता त्रिपाठी आणि आयेशा खान यांनी विशेष हजेरी लावली. तर मनसेच्या ‘जेन झी’ दहीहंडीला अमित ठाकरे यांच्या उपस्थितीने राजकीय व सामाजिक वर्तुळात चर्चा घडवून आणली. बोरिवली पूर्वेतील देवीपाडा मैदानावर आयोजित महोत्सवात दिग्गज अभिनेता संजय दत्त, अनिल कपूर, राकेश बेदी यांच्यासह मराठीतील स्टार सिद्धार्थ जाधव, नेहा खान आणि प्राजक्ता गायकवाड यांनी हजेरी लावून गोविंदांचा उत्साह द्विगुणित केला.

गोविंदांमधील सेलिब्रिटींच्या सहभागामुळे मुंबईची दहीहंडी केवळ हंडी फोडण्यापुरती मर्यादित न राहता त्याला भव्य सोहळ्याचे रूप प्राप्त झाले आहे. ढोल-ताशांचा दणदणाट, गोविंदांची जिद्द आणि त्याला मिळालेली सेलिब्रिटींची साथ यामुळे यंदाचा गोपाळकाला मुंबईकरांसाठी खऱ्या अर्थाने ‘सुपरहिट’ ठरला.
..........

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG : टीम इंडिया अफगाणिस्तानला घाबरलीय! माजी खेळाडूची निवड समितीवर टीका; म्हणाले, हताश होऊन उचललेले पाऊल...

Subhash Chandra: सुभाष चंद्रा यांच्यावर सीबीआयकडून फसवणुकीचा गुन्हा; 'एलआयसी'च्या तक्रारीवरुन मोठी कारवाई

Pakistan Chief of Defence Forces : पाकिस्तानची नवी खेळी; लष्करी व्यवस्थेत ऐतिहासिक सत्ताबदल, असीम मुनीर बनले ‘चीफ ऑफ डिफेन्स'

Marathi News Live Updates: केतन अग्रवाल हत्या प्रकरणात रितेश हांगे नावाच्या तरुणाला अटक

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना बाप्पा पावणार! गणेशोत्सवात महिलांना मिळणार ३,०००? योजनेबाबत नवी अपडेट समोर

SCROLL FOR NEXT