वांद्रे-पलिताना विशेष गाडी
आजपासून पहिली फेरी; मुंबई-अहमदाबाद, इंदूर विशेष गाड्यांच्या सेवांनाही मुदतवाढ
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ५ : प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन पश्चिम रेल्वेने वांद्रे टर्मिनस-पलितानादरम्यान विशेष सुपरफास्ट गाडी चालविण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष भाड्यावर धावणाऱ्या या गाडीच्या दोन फेऱ्या होणार आहेत. त्याचबरोबर मुंबई सेंट्रल-अहमदाबाद आणि मुंबई सेंट्रल-इंदूर मार्गावरील विशेष गाड्यांच्या सेवांनाही नोव्हेंबरअखेरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
गाडी क्रमांक ०९०२३ वांद्रे टर्मिनस-पलिताना विशेष ६ सप्टेंबरला रात्री ७.२५ वाजता वाद्रे टर्मिनसहून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ९.२५ वाजता पलिताना येथे पोहोचेल. परतीच्या प्रवासात ०९०२४ पलिताना-वांद्रे टर्मिनस विशेष ७ सप्टेंबरला रात्री ८ वाजता सुटून ८ सप्टेंबरला सकाळी ९.३० वाजता वाद्रे टर्मिनसला पोहोचेल.
बोरिवली, वापी, वलसाड, सूरत, वडोदरा, आणंद, अहमदाबाद, बोटाद, धोळा, सोनगढ आणि सिहोर येथे या गाडीला थांबे असतील. गाडीत स्लीपर आणि सामान्य द्वितीय श्रेणीचे डबे असतील. मुंबई सेंट्रल-अहमदाबाद विशेषच्या फेऱ्या अनुक्रमे २५ आणि २६ नोव्हेंबरपर्यंत वाढविण्यात आल्या आहेत. मुंबई सेंट्रल-इंदूर विशेषच्या ०९०७९/०९०८० गाड्या अनुक्रमे २९ आणि ३० नोव्हेंबरपर्यंत, तर ०९०८५/०९०८६ गाड्या अनुक्रमे २७ आणि २८ नोव्हेंबरपर्यंत धावतील. या विशेष गाड्यांचे आरक्षण केंद्रांवर आणि आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर आरक्षण सुरू आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.