मुंबई

‘दहीहंडी’ हा केवळ सण नसून परस्परांना मदत करण्याचा संदेश: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

CD

परस्परांना मदत करण्याचा
संदेश देणारा उत्सव ः मुख्यमंत्री

​सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ५ : ‘‘दहीहंडीची परंपरा ही केवळ मनोरंजनासाठी नसून ती मानवतेची आणि परस्परांना मदत करण्याची शिकवण देते. हंडी फोडून त्यातील दही-लोणी आपण सर्वांना वाटून खातो. याचाच अर्थ संकटाच्या वेळी आणि गरजेच्या प्रसंगी आपण इतरांच्या मदतीला धावून गेले पाहिजे, असा संदेश या उत्सवातून मिळतो.’’ तसेच ‘‘हा सण सर्वांनी अत्यंत आनंदाने आणि सुरक्षिततेची पूर्ण काळजी घेऊन साजरा करावा,’’ असे आवाहनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोविंदा पथकांना केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी वरळी आणि घाटकोपर येथील दहीहंडी महोत्सवांना उपस्थिती लावून गोविंदांचा उत्साह द्विगुणित केला. वरळीतील राजयोग प्रतिष्ठानतर्फे आयोजित दहीहंडी उत्सवात मुख्यमंत्र्यांनी पारंपरिक पद्धतीने श्रीफळ वाढवून हंडी फोडली. यंदाचा दहीहंडी उत्सव ‘ड्रग्जमुक्त भारत, ड्रग्जमुक्त महाराष्ट्र’ या संकल्पनेवर आधारित साजरा केला जात असल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांनी या उपक्रमाचे विशेष कौतुक केले. ​घाटकोपर येथे भाजप आमदार राम कदम यांनी आयोजित केलेल्या दहीहंडी उत्सवालाही मुख्यमंत्र्यांनी भेट दिली. या वेळी मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी व प्रमुख नेते उपस्थित होते.
......

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ketan Agarwal case: केतन अग्रवाल हत्या प्रकरणात तिसरा आरोपी अटकेत! कोण आहे रितेश हांगे? गुन्ह्यातला मास्टरमाईंड बीडचा?

Manchar News : २५ वर्षीय तरुणाचा हृदयविकाराने मृत्यू, दीड महिन्यापूर्वी झालेलं लग्न; पत्नीसह कुटुंबावर दुःखाचा डोंगर

Mangalwedha News : दामाजीच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे आंदोलन 22 व्या दिवशी मागे

Marathi News Live Updates: 'दामाजी'च्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे आंदोलन 22 व्या दिवशी मागे

Sonam Wangchuk : तर सोनम वांगचुक भारतातील सर्वात मोठ्या आंदोलनाच्या तयारीत; सरकारने मागणी मान्य न केल्यास काय होणार?

SCROLL FOR NEXT