मुंबई

अभिनव उपक्रमांतून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास

CD

केवळ पुस्तकी ज्ञान नको!
शिक्षक प्रेरणा संवाद सत्रातून संदेश

मुंबई, ता. ५ ः शिक्षक दिनाचे औचित्य साधून राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (एससीईआरटी) यांच्या माध्यमातून आयोजित ‘शिक्षक प्रेरणा संवाद सत्रा’मध्ये गुणवंत शिक्षकांनी आपल्या शाळांमध्ये राबवलेल्या नावीन्यपूर्ण उपक्रमांची माहिती दिली. विद्यार्थ्यांचे केवळ पुस्तकी ज्ञान वाढविण्याऐवजी कौशल्य, संस्कार, सृजनशीलता आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणावर भर देण्याचा संदेश या संवादातून देण्यात आला.
या कार्यक्रमाला शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांच्यासह शिक्षण विभागातील विविध वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या वेळी नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हिवाळीचे शिक्षक केशव गावित यांनी ‘३६५ दिवसांची शाळा, निसर्गाच्या सान्निध्यात शिक्षण’ या संकल्पनेची माहिती दिली. त्यांच्या शाळेत विद्यार्थ्यांना नियमित अभ्यासक्रमासोबत शेती, पशुपालन, कुक्कुटपालन, मत्स्यपालन, मधमाशीपालन, औषधी वनस्पती, गांडूळखत आणि सेंद्रिय शेती यांसारख्या उपक्रमांत प्रत्यक्ष सहभागी करून घेतले जाते. गावाच्या विकासाशी शाळेला जोडण्याचा प्रयत्नही या उपक्रमातून करण्यात येत आहे. आदिवासी संस्कृती दालन, शेतीचे मॉडेल आणि विविध उपक्रमांच्या माध्यमातून शाळेला शैक्षणिक पर्यटनाचे केंद्र बनवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे गावित यांनी सांगितले.
वाशिम जिल्ह्यातील साखरा येथील जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक देवीदास महाले यांनी ‘लोकसहभागातून गुणवत्ता विकास’ या विषयावर अनुभव मांडला. एकेकाळी अत्यल्प विद्यार्थीसंख्या असलेल्या आणि प्रतिकूल परिस्थितीमुळे शिक्षकही येण्यास इच्छुक नसलेल्या शाळेत गुणवत्तावाढीचे काम सुरू करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या पाढे, गणिती क्रिया आणि इंग्रजीसह विविध विषयांतील प्रगती दिसू लागल्यानंतर पालकांचा शाळेवरील विश्वास वाढला. गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या माध्यमातून लोकसहभाग मिळवता येतो, हा अनुभव महाले यांनी मांडला.

शिक्षकांनी मांडले अनुभव
या संवाद सत्रात नाशिक, वाशिम, नागपूर, धाराशिव, सोलापूर आणि कोल्हापूर आदी जिल्ह्यांतील शिक्षक सहभागी झाले. गुणवत्तापूर्ण शिक्षण, लोकसहभाग, विज्ञान, इंग्रजी, क्रीडा, कला शिक्षण तसेच ‘निपुण महाराष्ट्र’ आणि विशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्यांसाठीच्या उपक्रमांवर शिक्षकांनी आपले अनुभव मांडले. वरिष्ठ अधिकाऱ्यांचे केवळ मार्गदर्शन न ठेवता प्रत्यक्ष शाळांमध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या शिक्षकांनाच आपले अनुभव मांडण्यासाठी व्यासपीठ देणे, हे या कार्यक्रमाचे विशेष वैशिष्ट्य ठरले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : बनावट प्रमाणपत्रे देऊन पुणे पोलिस दलात १९ उमेदवार भरती झाल्याचे उघडकीस; दोघांना अटक

IND vs PAK Asia Cup: ना हस्तांदोलन, ना नजरेला नजर.. हरमनप्रीत कौरचा वर्ल्ड रेकॉर्ड अन् टॉसच्या वेळीच उतरवला पाकिस्तानचा माज

Bhoom News : ईटच्या सुपुत्र डॉ. किरण प्रकाश झरकर यांचा राष्ट्रपतीं द्रोपदी मुर्मु यांच्या हस्ते दिल्ली येथे राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने गौरव

Ketan Agarwal case: केतन अग्रवाल हत्या प्रकरणात तिसरा आरोपी अटकेत! कोण आहे रितेश हांगे? गुन्ह्यातला मास्टरमाईंड बीडचा?

Manchar News : २५ वर्षीय तरुणाचा हृदयविकाराने मृत्यू, दीड महिन्यापूर्वी झालेलं लग्न; पत्नीसह कुटुंबावर दुःखाचा डोंगर

SCROLL FOR NEXT