मुंबई

बंद एनटीसी गिरणी कामगारांचे ७ सप्टेंबरपासून उपोषण

CD

बंद एनटीसी गिरणी कामगारांचे ७ सप्टेंबरपासून उपोषण

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ५ : गौरी-गणपती सण तोंडावर आलेला असताना ११ महिन्यांचा थकीत पगार न मिळाल्याने मुंबईतील बंद एनटीसी गिरण्यांमधील कामगारांमध्ये तीव्र नाराजी आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या वतीने कामगार सोमवारपासून (ता. ७) लाक्षणिक उपोषणाला बसणार आहेत.
गिरणी कामगार नेते आणि विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांनी गेल्या महिन्यात दिल्ली दौऱ्यात केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरिराज सिंह आणि वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांची खासदारांच्या शिष्टमंडळासह भेट घेऊन बंद गिरण्या पूर्ववत सुरू करा आणि थकीत देणी त्वरित द्या, अशी मागणी केली होती. तेव्हा केंद्राने सकारात्मकता दाखवली होती; मात्र व्यवस्थापनाकडून गिरण्या सुरू करण्याबाबत कोणतीही हालचाल झाली नाही. कोविड लॉकडाऊनपासून बंद असलेल्या या गिरण्यांमुळे सुमारे १० हजार कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. या पार्श्वभूमीवर संघटनेचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत लाक्षणिक उपोषणाचा निर्णय घेण्यात आला. टाटा, इंदू मिल क्रमांक ५, पोदार आणि दिग्विजय या चार बंद गिरण्यांच्या गेटवर कामगार उपोषण करणार आहेत.
...
प्रमुख मागण्या अशा
- ऑक्टोबर २०२५ ते ऑगस्ट २०२६ या ११ महिन्यांचा पगार त्वरित द्यावा.
- २०२५मध्ये निवृत्त झालेल्या कामगारांची ग्रॅच्युइटी द्यावी आणि घरभाडे द्यावे.
- प्रवास व मेडिकल भत्ता द्यावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : बनावट प्रमाणपत्रे देऊन पुणे पोलिस दलात १९ उमेदवार भरती झाल्याचे उघडकीस; दोघांना अटक

IND vs PAK Asia Cup: ना हस्तांदोलन, ना नजरेला नजर.. हरमनप्रीत कौरचा वर्ल्ड रेकॉर्ड अन् टॉसच्या वेळीच उतरवला पाकिस्तानचा माज

Bhoom News : ईटच्या सुपुत्र डॉ. किरण प्रकाश झरकर यांचा राष्ट्रपतीं द्रोपदी मुर्मु यांच्या हस्ते दिल्ली येथे राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने गौरव

Ketan Agarwal case: केतन अग्रवाल हत्या प्रकरणात तिसरा आरोपी अटकेत! कोण आहे रितेश हांगे? गुन्ह्यातला मास्टरमाईंड बीडचा?

Manchar News : २५ वर्षीय तरुणाचा हृदयविकाराने मृत्यू, दीड महिन्यापूर्वी झालेलं लग्न; पत्नीसह कुटुंबावर दुःखाचा डोंगर

SCROLL FOR NEXT