मुंबई

मालवाहतुकीला येणार गती

CD

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. ७ : डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरमुळे (डीएफसी) देशातील मालवाहतुकीचे पारंपरिक चित्र बदलत असून, महाराष्ट्राच्या लॉजिस्टिक्स क्षेत्रालाही त्याचा मोठा फायदा होणार आहे. उत्तर भारतातील औद्योगिक पट्ट्यातून येणाऱ्या मालगाड्या वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरमार्फत थेट न्यू जेएनपीटी बंदरापर्यंत पोहोचत असल्याने महाराष्ट्रातील बंदरे, औद्योगिक क्षेत्रे आणि लॉजिस्टिक्स केंद्रांना जलद रेल्वे जोडणी मिळाली आहे. भविष्यात तिसरा फ्रेट कॉरिडॉर महाराष्ट्राशी जोडला गेल्यास ही यंत्रणा आणखी सक्षम होण्याची शक्यता आहे.

देशात सध्या ईस्टर्न आणि वेस्टर्न, असे दोन प्रमुख डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर कार्यरत आहेत. पंजाबमधील न्यू साहनेवाल ते बिहारमधील न्यू सोननगर असा सुमारे एक हजार ३३७ किलोमीटरचा ईस्टर्न डीएफसी, तर न्यू दादरी ते न्यू जेएनपीटी असा सुमारे १ हजार ५०६ किलोमीटरचा वेस्टर्न डीएफसी आहे. या दोन्ही मार्गांची एकत्रित लांबी सुमारे दोन हजार ८४३ किलोमीटर आहे.

या समर्पित मार्गांमुळे मालगाड्यांना प्रवासी गाड्यांपासून स्वतंत्र मार्ग उपलब्ध झाला आहे. त्यामुळे मालगाड्यांचा वेग आणि वहनक्षमता वाढण्यास मदत झाली आहे. विशेषतः डबल स्टॅक कंटेनर रेक थेट बंदरांपर्यंत पोहोचत असल्याने कंटेनर वाहतुकीची कार्यक्षमता वाढली आहे. त्याचबरोबर मुख्य रेल्वे मार्गांवरील मालवाहतुकीचा ताण कमी झाल्याने प्रवासी रेल्वे सेवांसाठीही मार्ग क्षमता उपलब्ध होत आहे.

‘समृद्धी’ला समांतर जोडणीची शक्यता
देशातील तिसऱ्या डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरची घोषणा झाल्यानंतर त्याची महाराष्ट्राशी जोडणी करण्याच्या पर्यायांवर लक्ष केंद्रित झाले आहे. हा कॉरिडॉर राज्यातील समृद्धी महामार्गाला समांतर नेण्याची शक्यता तपासली जात आहे. अशी जोडणी प्रत्यक्षात आल्यास मुंबई महानगर प्रदेश, जेएनपीटी तसेच विदर्भ आणि मराठवाड्यातील औद्योगिक पट्ट्यांना मालवाहतुकीसाठी अधिक सक्षम रेल्वे पर्याय उपलब्ध होऊ शकतो.

लॉजिस्टिक्स खर्चात बचतीची अपेक्षा
मालवाहतुकीचा वेळ कमी झाल्याने उद्योगांच्या पुरवठा साखळीला वेग मिळत आहे. रेल्वेमार्गे मोठ्या प्रमाणावर मालाची वाहतूक शक्य झाल्याने रस्ते वाहतुकीवरील अवलंबित्व आणि लॉजिस्टिक्स खर्च कमी करण्यास मदत होत आहे. न्यू जेएनपीटीसारख्या प्रमुख बंदराला देशातील उत्पादन आणि औद्योगिक केंद्रांशी थेट रेल्वे जोडणी मिळाल्याने महाराष्ट्राच्या व्यापाराला तसेच निर्यात-आयात क्षेत्राला दीर्घकालीन फायदा होण्याची अपेक्षा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI Surya Kant: देशाच्या सरन्यायाधीशांनी घेतली बीडच्या रमाबाईंची दखल; लेकीच्या शिक्षणासाठी धावणाऱ्या महिलेला भरीव मदत

Pune News : विनापरवाना लावणीचा कार्यक्रम; मंडळाच्या अध्यक्षांसह नृत्यांगना राधा पाटील यांच्यावर गुन्हा दाखल

Social Media: 'Likes' मुळे वाढतोय मानसिक ताण? Post's च्या मोहात अडकतात डिप्रेशनग्रस्त लोक; संशोधनातून धक्कादायक खुलासा!

Marathi News Live Updates: तळेगाव ढमढेरे परिसरात विजेमुळे ग्रामस्थ त्रस्त

आई म्हणाली ‘चॉकलेट बंद कर’; स्क्वॉशपटू अनाहतने थेट न्यूट्रिशनिस्टलाच फोन केला! नेमकं काय घडलं? Viral Video

SCROLL FOR NEXT