मुंबई

महामुंबईत २२१ गोविंदा जखमी

CD

महामुंबईत २२१ गोविंदा जखमी
मालवणीत सातवर्षीय मुलाचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
मुंबई/ठाणे, ता. ६ : दहीहंडी उत्सवात मानवी मनोरे रचताना झालेल्या दुर्घटनांमध्ये आज महामुंबईत एका गोविंदाचा मृत्यू झाला, तर २२१ गोविंदा जखमी झाले. मुंबईत १८१, ठाण्यात ३८, तर नवी मुंबईत दोन गोविंदा जखमी झाल्याची नोंद झाली.
मालाडच्या मालवणीतील चिकूवाडी परिसरात एकता वेल्फेअर सोसायटी येथे दहीहंडी उत्सवादरम्यान रुद्र कदम (वय ७) याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले; मात्र त्याचा मृत्यू झाला. दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदा थरावर थर रचत असताना दहीहंडी ज्या खांबाला दोरीच्या सहाय्याने लटकवण्यात आली होती, ती दोरी तुटली. त्यानंतर संबंधित खांबही कोसळला. त्यात हा मृत्यू झाला.
मुंबईतील विविध सरकारी आणि महापालिका रुग्णालयांत १६८ गोविंदा जखमी झाल्याची नोंद झाली आहे. त्यापैकी २९ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. ८१ जणांवर उपचार सुरू आहेत, तर उपचारानंतर ५८ गोविंदांना डिस्चार्ज देण्यात आला. रात्री ९ वाजेपर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, सेंट्रल रिजनमधील रुग्णालयांत १०६, पूर्व उपनगरांमधील रुग्णालयांत २९, तर पश्चिम उपनगरांतील रुग्णालयांत ३३ जखमी गोविंदांची नोंद झाली. केईएम रुग्णालयात सर्वाधिक ३३ जखमी दाखल झाले. त्यापैकी सहा जण रुग्णालयात दाखल असून, १२ जणांवर उपचार सुरू आहेत, तर १५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. राजावाडी रुग्णालयात २०, नायरमध्ये १७, पोदारमध्ये १६, हिंदुजा येथे १४, बीडीबीए रुग्णालयात १३, तर सायन रुग्णालयात आठ जखमी गोविंदांची नोंद झाली. राजावाडी येथे सहा जण दाखल असून, पाच जणांवर उपचार सुरू आहेत. नायरमध्ये चार जण दाखल असून, १३ जणांवर उपचार सुरू आहेत. सायनमध्ये चार जण दाखल आहेत. हिंदुजा येथे दोन, तर बीडीबीए रुग्णालयात दोन गोविंदांना दाखल करण्यात आले आहे. दरवर्षी दहीहंडीच्या उत्साहात मानवी मनोरे रचताना गोविंदांना दुखापत होते. यंदाही थरांचा थरार कायम असताना जखमींची संख्या वाढली आहे. याशिवाय सरकारच्या जे. जे. रुग्णालय आणि सेंट जॉर्ज रुग्णालयात सुमारे १३ जखमी गोविंदांची नोंद झाली आहे.
...
ठाण्यातील ३८ जण जखमी
दहीहंडीसाठी उंचच उंच मानवी मनोरे रचताना ठाणे शहरात ३८ गोविंदा जखमी झाले. नऊ वाजेपर्यंतच्या ठाणे महापालिकेच्या माहितीनुसार, छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात २२, तर जिल्हा शासकीय रुग्णालयात १६ गोविंदा उपचारासाठी दाखल झाले आहेत. विशेष म्हणजे जखमींमध्ये मुंबईतील विविध भागांतील १२ ते १३ गोविंदांचा, उर्वरित ठाण्यातील गोविंदांचा तसेच तब्बल ६५ वर्षीय वयोवृद्ध गोविंदाचा समावेश आहे.
...
६५ वर्षांचे नंदकिशोर जखमी
दहीहंडीच्या मानवी मनोऱ्यात सहभागी झालेल्या नंदकिशोर शेलार (वय ६५) यांना डोक्याला दुखापत झाली. वयाच्या ६५व्या वर्षीही दहीहंडीच्या उत्साहात सहभागी झालेल्या शेलार यांना दुखापत झाल्याने त्यांचा समावेश यंदाच्या जखमी गोविंदांच्या यादीत झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs PAK : शफाली वर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड! पाकिस्तानला पहिल्याच चेंडूवर जागा दाखवली; जगात भारी कामगिरी केली Video Viral

DCM Sunetra Pawar : हजार शाळा ‘मॉडेल स्कूल’बनविणार; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

India China Strategy: चीनच्या तुलनेत भारताची तंत्रज्ञान क्षमता वाढविण्याची गरज; ‘चायना कॉन्फरन्स २०२६’मध्ये तज्ज्ञांचा सूर

Sangramdurg Ground Fort : ‘संग्रामदुर्ग’चा दोनशे वर्षांपूर्वीचा नकाशा पुरातत्त्व विभागाकडे मिळाला

Narendra Modi: मोदींचा राहुल गांधींवर हल्ला! म्हणाले, त्यांचा एकच पेटंट डायलॉग असतो.. 'याची काय गरज होती?'

SCROLL FOR NEXT