आरोपीच्या जामीन अर्जाला पीडितेच्या कुटुंबीयांचा विरोध
वांद्रे रस्ता अपघात प्रकरण; साक्षीदारांना प्रभावित करण्याची व्यक्त केली चिंता
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ६ : मागील आठवड्यात वांद्रे येथे झालेल्या अपघातामध्ये मृत्यू पावलेल्या आठ वर्षांच्या मुलाच्या कुटुंबीयांनी मुख्य आरोपी मेघा रावलच्या (न्यूट्रिशनिस्ट) जामीन अर्जाला विरोध केला. अर्जदाराने आधीच एका साक्षीदाराला प्रभावित करण्याचा प्रयत्न केल्याचा दावा मृत पीडिताच्या कुटुंबीयांनी केला. सर्व पक्षकारांचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर सत्र न्यायालयाने निर्णय राखून ठेवला आहे.
अर्जदार जेव्हा त्यांची इनोव्हा क्रिस्टा गाडी भरधाव वेगाने चालवत असताना रस्ता ओलांडत असलेल्या मुलाला धडकली, तेव्हा त्या मोबाईल फोनवर बोलत असल्याचा आरोप प्रत्यक्षदर्शी आणिव मृत अंशच्या कुटुंबीयांनी केला. तर ही एक दुर्दैवी घटना असून, अर्जदाराला तुरुंगात ठेवल्याने कोणताही हेतू साध्य होणार नाही, असा युक्तिवाद निरंजन मुंदरगी यांनी केला. तसेच ही घटना केवळ एक अपघात असल्याने भारतीय न्याय संहिता (बीएनएस) अंतर्गत कलम १०५ (सदोष मनुष्यवध) चा आरोप लागू होत नसल्याचा दावाही त्यांनी केला.
दुसरीकडे, प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, अर्जदार गाडी चालवताना फोनवर बोलत असल्यामुळे अपघात झाला. गाडी चालवताना मोबाईल फोन वापरण्याची कृती धोकादायक असल्याची अर्जदाराला जाणीव होती, असा युक्तिवाद राज्य सरकारने केला. त्याच वेळी साक्षीदारांना प्रभावित करू नये, त्यांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी आरोपीवर वांद्रे परिसरात प्रवेश न करण्यास बंदी घालावी, अशी विनंतीही राज्य सरकारकडून करण्यात आली. सर्व पक्षकारांचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने अखेर आपला निर्णय राखून ठेवला.
प्रकरण काय?
वांद्रे पश्चिम येथील सेंट जॉन बाप्टिस्ट रोडवर ३० ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी २च्या सुमारास भरधाव इनोव्हा कारच्या धडकेत आठ वर्षांच्या अंश गुप्ताचा मृत्यू झाला. याप्रकरणी ४५ वर्षीय न्यूट्रिशनिस्ट मेघा रावल यांना पोलिसांनी अटक केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.