मुंबई

राज्यात अवयवदानाला वेग

CD

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. ६ : महाराष्ट्रात अवयवदानाबाबत नागरिकांच्या दृष्टिकोनात सकारात्मक बदल होत असून, त्याचा परिणाम प्रत्यारोपणाच्या आकडेवारीतही दिसून येत आहे. राज्यात आतापर्यंत अवयवदानाच्या माध्यमातून तीन हजार ३७३ गरजू रुग्णांना नवजीवन मिळाले आहे. यामध्ये १,८५३ किडनी, ९८७ यकृत, २२० हृदय आणि ६३ फुप्फुस प्रत्यारोपणांचा समावेश आहे. अवयवदानाबाबत जनजागृती वाढविण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाकडून राज्यभर विविध उपक्रम राबविले जात आहेत.

आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी राज्यभर अवयवदानाबाबत व्यापक जनजागृती अभियान राबविण्याचे आवाहन केले आहे. शासन, सार्वजनिक आरोग्य विभाग, प्रादेशिक अवयव व ऊतक प्रत्यारोपण समन्वय संस्था तसेच मुंबई, पुणे, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय प्रत्यारोपण समन्वय केंद्रांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे अवयवदानाबाबत सकारात्मक वातावरण निर्माण झाले असल्याचे त्यांनी सांगितले.

१७ हजार जिवंत दात्यांकडून प्रत्यारोपण
शासकीय आकडेवारीनुसार, १९९५ ते ऑक्टोबर २०२६ या कालावधीत राज्यात जिवंत दात्यांकडून अवयव प्रत्यारोपणाच्या १७ हजार ३२५ शस्त्रक्रिया झाल्या आहेत. यामध्ये १४ हजार ९४९ किडनी आणि दोन हजार ३७६ यकृत प्रत्यारोपणांचा समावेश आहे. त्याचबरोबर अवयवदानाच्या माध्यमातून तीन हजार ३७३ रुग्णांना जीवदान मिळाले आहे. यामध्ये किडनी, यकृत, हृदय आणि फुप्फुसांसह डोळे व अन्य ऊतकांच्या प्रत्यारोपणाचाही समावेश आहे.

किडनीसाठी सर्वाधिक रुग्ण प्रतीक्षेत
राज्यात अद्याप मोठ्या संख्येने रुग्ण अवयव प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेत आहेत. उपलब्ध आकडेवारीनुसार चार हजार ०७५ रुग्ण किडनी, ८८८ यकृत, ६३ हृदय, २४ फुप्फुस, १५ स्वादुपिंड, ११ हात आणि ८ रुग्ण लहान आतड्याच्या प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे अवयवदानाची गरज अद्याप मोठ्या प्रमाणात कायम आहे.

‘जुग-जुग जिओ’ अभियान
अवयवदानाबाबत जनजागृती वाढविण्यासाठी राज्यात २ ते १५ ऑगस्ट २०२६ या कालावधीत ‘अवयवदान पंधरवडा’ आयोजित करण्यात आला. या कालावधीत १३ ऑगस्टला १६वा अवयवदान दिन साजरा करण्यात आला. तसेच ३ ते १५ ऑगस्टदरम्यान ‘जुग-जुग जिओ अभियान’ राबविण्यात आले. या अभियानांतर्गत तज्ज्ञ डॉक्टर, प्रसिद्ध व्यक्ती आणि धर्मगुरूंचे संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आले. अवयवदानामुळे नवजीवन मिळालेल्या रुग्णांच्या प्रेरणादायी कहाण्याही प्रसारित करण्यात आल्या. नागरिकांना क्यूआर कोड आणि अधिकृत संकेतस्थळाच्या माध्यमातून अवयवदानाची शपथ घेण्याची तसेच आपली प्रतिज्ञा नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vishwas Nangare Patil Kunbi Certificate : विश्वास नांगरे -पाटील यांनी कुणबी दाखल्याचा वापर केला? अंतरवालीत ओबीसी आंदोलनात दावा; वातावरण तापलं

९ वर्षांच्या एकटेपणानंतर अपूर्वा नेमळेकरांनी सांगितली मनातली गोष्ट; दुसऱ्या लग्नाबद्दल बोलताना म्हणाली...

Yoga For Everyone: लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व वयोगटांसाठी 'ही' आहेत सर्वोत्तम योगासने! आरोग्य अन् मानसिक शांतीची पक्की गॅरंटी...

Marathi News Live Updates : मराठा आंदोलकांनी भाजप आमदाराला अडवलं, नेमकं काय घडलं?

Indapur Politics : इंदापुरात पुन्हा पाटील-गारटकर जवळ; नव्या राजकीय समीकरणांची चर्चा, हर्षवर्धन पाटील भाकरी फिरवणार?

SCROLL FOR NEXT