एमबीबीएस व बीडीएसच्या
पहिल्या फेरीत ७५.१५ टक्के विद्यार्थ्यांचे प्रवेश
मुंबई, ता. ६ : राज्यभरात वैद्यकीय शिक्षणाच्या अंतर्गत असलेल्या एमबीबीएस व बीडीएस पदवी अभ्यासक्रमाच्या राज्याच्या कोट्यांतर्गत केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या फेरीत दोन्ही अभ्यासक्रमाच्या १० टक्के ६४६ जागा उपलब्ध होत्या. त्यापैकी ८,००१ म्हणजे ७५.१५ टक्के विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले आहेत. दुसऱ्या फेरीसाठी फक्त २,६४५ जागा उपलब्ध आहेत. या पहिल्या फेरीत राज्यात एमबीबीएसच्या आठ हजार १२९ जागांपैकी सहा हजार ८७६ म्हणजे ८४.५८ टक्के विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले आहेत. १,२५३ जागा रिक्त आहेत.
यामध्ये राज्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसच्या ४,९८० जागा आहेत. यामध्ये ४,६६५ म्हणजे ९३.६७ टक्के विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले आहेत व ४१५ जागा रिक्त आहेत. प्रवेश झालेल्यांमध्ये ८८८ विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी जागा फ्रिज केलेल्या आहेत, तर ३,६७७ विद्यार्थ्यांनी जागा बेटरमेंट केल्या आहेत. तसेच राज्यात खासगी वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसच्या ३,१४९ जागा आहेत. यामध्ये २,३११ विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले आहेत व ८३८ जागा रिक्त आहेत. प्रवेश झालेल्यांमध्ये २४९ विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी जागा फ्रिज केलेल्या आहेत तर २,०६२ विद्यार्थ्यांनी जागा बेटरमेंट केल्या आहेत. या पहिल्या फेरीत राज्यात बीडीएसच्या दोन हजार ५१७ जागांपैकी एक हजार १२५ विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले आहेत. १,३९२ जागा रिक्त आहेत.
यामध्ये राज्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात बीडीएसच्या ३१७ जागा आहेत. यामध्ये १९६ विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले आहेत व १२१ जागा रिक्त आहेत. प्रवेश झालेल्यांमध्ये १९ विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी जागा फ्रिज केलेल्या आहेत तर १७७ विद्यार्थ्यांनी जागा बेटरमेंट केल्या आहेत. तसेच राज्यात खासगी वैद्यकीय महाविद्यालयात बीडीएसच्या २,२०० जागा आहेत. यामध्ये ९२९ विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले आहेत व १,२७१ जागा रिक्त आहेत. प्रवेश झालेल्यांमध्ये १६१ विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी जागा फ्रिज केलेल्या आहेत तर ७६८ विद्यार्थ्यांनी जागा बेटरमेंट केल्या आहेत.
दुसऱ्या फेरीचे वेळापत्रक जाहीर
पहिल्या फेरीच्या प्रवेशानंतर रिक्त राहिलेल्या एमबीबीएस व बीडीएस या वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या फेरीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. यानुसार दुसऱ्या फेरीसाठी एकूण किती जागा उपलब्ध आहेत, हे ७ सप्टेंबरला जाहीर केले जाईल. यानंतर ८ ते १० सप्टेंबरदरम्यान विद्यार्थी प्राधान्यक्रम भरतील. १२ सप्टेंबरला केंद्रीभूत प्रवेशफेरी २चे जागावाटप जाहीर केले जाईल.
--
प्रवेशाचा तपशील
• एमबीबीएस : ८४.५८ टक्के प्रवेश
एकूण जागा झालेले प्रवेश रिक्त जागा
शासकीय : ४,९८० ४,६६५ ४१५
(फ्रिज जागा ८८८, बेटरमेंट जागा ३,६७७)
एकूण शासकीय एमबीबीएस प्रवेश ९३.६७ टक्के
खासगी : ३,१४९ २,३११ ८३८
(फ्रिज जागा २४९, बेटरमेंट जागा २,०६२)
एकूण : ८,१२९ ६,८७६ १,२५३
एकूण खासगी एमबीबीएस प्रवेश ७३.३८ टक्के
• बीडीएस : ४४.६९ टक्के प्रवेश
एकूण जागा झालेले प्रवेश रिक्त जागा
शासकीय : ३१७ १९६ १२१
(फ्रिज जागा १९, बेटरमेंट जागा १७७)
एकूण शासकीय बीडीएस प्रवेश ६१.८२ टक्के
खासगी : २,२०० ९२९ १,२७१
(फ्रिज जागा १६१, बेटरमेंट जागा ७६८)
एकूण : २,५१७ १,१२५ १,३९२
एकूण खासगी बीडीएस प्रवेश ४२.२२ टक्के