मुंबई, ता. ६ : माउंट मेरी यात्रा १३ ते २० सप्टेंबर या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. यात्रेनिमित्त लाखो भाविक माउंट मेरी चर्चला भेट देण्यासाठी येतात. त्यामुळे माउंट मेरी परिसर व बांद्रा वाहतूक विभागातील इतर रस्त्यांवर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या काळात वाहतूक बदल करण्यात आले आहेत.
एक दिशा मार्ग/प्रवेश बंद
१) माउंट मेरी रोड हा सकाळी ६ ते रात्री ११ वाजेपर्यंत स्थानिक पासधारक रहिवाशांची तसेच पोलिस व आपत्कालीन वाहने वगळता इतर सर्व प्रकारच्या वाहनांकरिता बंद राहील.
२) केन रोड हा माउंट मेरी रोडपासून पुढे बी. जे. रोडपर्यंत स्थानिक पासधारक रहिवाशांची वाहने तसेच आपत्कालीन वाहने वगळता इतर सर्व प्रकारच्या वाहनांकरीता एक दिशा मार्ग असेल, म्हणजेच बी. जे. रोडपासून प्रवेश बंद असेल.
३) परेरा रोड हा पूर्वेकडून पश्चिमेकडे जाण्याकरिता एक दिशा मार्ग असेल, म्हणजेच बी. जे. रोडपासून या मार्गावर प्रवेश बंद असेल.
४) सेंट जॉन बॅप्टीस्ट रोड हा स्थानिक पासधारक रहिवाशांची वाहने तसेच आपत्कालीन वाहने वगळता इतर सर्व प्रकारच्या वाहनांकरिता सकाळी ६ ते रात्री ११ वाजेपर्यंत बंद राहील.
५) कारमेल चर्च याठिकाणी चॅपल रोडकडून वेरोनिका रोडकडे जाण्याकरिता असलेले उजवे वळण बंद राहील.
अवजड वाहने मनाई (सकाळी ६ ते रात्री ११दरम्यान)
१) के. सी. मार्ग
२) बॅपेल रोड
३) सेंट जॉन बॅप्टीस्ट रोड
४) सेंट सिबेस्टीयन रोड
५) माउंट कारमेल रोड
६) माउंट मेरी रोड
७) बी. जे. रोड
८) केन रोड
नो पार्किंग कुठे
१) माउंट मेरी रोड
२) परेरा रोड
३) केन रोड
४) हिल रोड (सेंट पॉल रोड व मेहबूब सर्कल या दरम्यान)
५) माउंट कार्मेल रोड
६) बॅपेल रोड
७) जॉन बॅप्टीस्ट रोड
८) सेंट सॅबेस्टीन रोड
९) रिबेलो रोड
१०) डॉ. पिटर डायस रोड
११) सेंट पॉल रोड
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.