मुंबई, ता. ७ : प्लॅस्टिक पॅकेजिंग बनवणारी कंपनी मणिका प्लास्टेकचा आयपीओ ११ ते १६ सप्टेंबरदरम्यान बाजारात येत असून, त्यासाठी ४० ते ४३ रुपये किंमतपट्टा निश्चित करण्यात आला आहे.
वेगवेगळ्या आकाराचे आणि वेगवेगळ्या प्रकारचे प्लॅस्टिक कंटेनर, बादल्या, बॅटरी कव्हर आदी प्लॅस्टिक पॅकेजिंग बनवणारी ही कंपनी आहे. बॅटरी, रंग, रसायने, वंगण आदी उद्योगांसाठी त्यांच्यातर्फे पॅकेजिंग पुरवले जाते. बिर्ला ओपस, नेरोलॅक पेंट्स, जेएसडब्ल्यू पेंट, ग्रासीम, लुमिनस पॉवर, टीव्हीएस मोटर आदी बड्या कंपन्या त्यांचे ग्राहक आहेत. नेपाळ, श्रीलंका, इटली, झिम्बाब्वे, बांगलादेश, ओमान आदी अनेक देशांत त्यांची उत्पादने निर्यात होतात. कंपनीचे देशात सहा उत्पादन प्रकल्प असून, त्यांची वेगवेगळ्या ६७१३ प्रकारची उत्पादने आहेत. त्यांचे २४२ ग्राहक असून, त्यांची उत्पादनक्षमता १९,२०० मॅट्रिक टन दरवर्षी आहे. त्यांचा ५४ टक्के महसूल बॅटरीच्या कव्हर पॅकिंग पासून येतो, असे कंपनीचे एमडी मुंजाळ कपाडिया म्हणाले. हा इश्यू १२५ कोटी रुपयांचा आहे. नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षात कंपनीचा महसूल ४३६ कोटी रुपये असून, निव्वळ नफा २२ कोटी रुपये आहे. आयपीओमधून मिळणारा निधी कंपनीची यंत्रसामग्री घेण्यासाठी आणि जुन्या कर्जांच्या परतफेडीसाठी वापरला जाईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.