मुंबई

रूळ ओलांडण्याचा हट्ट; जुलैमध्ये विक्रमी ४,५५० प्रकरणे

CD

रूळ ओलांडण्याचा हट्ट; जुलैमध्ये विक्रमी ४,५५० प्रकरणे
सहा महिन्यांच्या एकूण संख्येलाही टाकले मागे; जीवाशी खेळासोबत लोकल वाहतुकीलाही फटका
नितीन बिनेकर ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ७ : पादचारी पूल किंवा भुयारी मार्गाचा वापर करून काही मिनिटे अधिक चालण्यापेक्षा थेट रूळ ओलांडण्याचा शॉर्टकट घेण्याची प्रवाशांची घाई जीवघेणी ठरत आहे. मुंबई विभागात रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) केलेल्या कारवाईत जानेवारी ते जुलै २०२६ या सात महिन्यांत एकूण ८,४११ रूळ ओलांडण्याची प्रकरणे नोंदविण्यात आली. धक्कादायक म्हणजे यापैकी ४,५५० प्रकरणे एकट्या जुलै महिन्यातील आहेत. ही संख्या जानेवारी ते जून या सहा महिन्यांतील ३,८६१ प्रकरणांपेक्षा तब्बल ६८९ ने अधिक आहे.
रूळ ओलांडण्याची बेफिकिरी संबंधित व्यक्तीचा जीव धोक्यात घालण्याबरोबरच लोकल वाहतुकीलाही फटका देते. अपघात झाल्यास संबंधित ठिकाणी लोकल थांबवावी लागते. त्यामुळे मागील गाड्यांच्या फेऱ्यांवर परिणाम होऊन हजारो प्रवाशांना विलंब सहन करावा लागतो. एका व्यक्तीच्या काही मिनिटांच्या घाईची किंमत हजारो प्रवाशांना वेळेच्या रूपाने मोजावी लागते.
रूळ ओलांडणे हा शॉर्टकट नसून स्वतःच्या जीवासह इतर प्रवाशांच्या वेळेशी केलेला धोकादायक खेळ आहे. जुलैतील विक्रमी आकडेवारीनंतर केवळ दंडात्मक कारवाई न करता अशा ठिकाणी कडक प्रतिबंधात्मक उपाययोजना (सीसीटीव्ही निरीक्षण, जागरूकता मोहीम आणि भौतिक अडथळे) करण्याची गरज अधोरेखित झाली आहे.

जुलैमध्ये अचानक उसळी
जानेवारीत ४३८, फेब्रुवारीत ७९६, मार्चमध्ये ५६३, एप्रिलमध्ये ३१२ आणि मेमध्ये ३४५ प्रकरणे नोंदली गेली. जूनमध्ये हा आकडा १,४०७ वर पोहोचला, मात्र जुलैमध्ये रूळ ओलांडण्याच्या प्रकरणांनी अचानक उसळी घेत थेट ४,५५० चा टप्पा गाठला. सात महिन्यांतील एकूण प्रकरणांपैकी तब्बल ५४ टक्के प्रकरणे एकट्या जुलैमध्ये नोंदली गेली.

दंडाची भीतीही नाही
सात महिन्यांत ५,५३५ प्रकरणांत दंडात्मक तर २,८७६ प्रकरणांत न्यायालयीन कारवाई करण्यात आली. या कारवाईतून एकूण ३८ लाख ८० हजार ६९७ रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. जुलैमध्ये ४,५५० प्रकरणांपैकी तब्बल ४,५४९ प्रकरणांत दंडात्मक कारवाई करण्यात आली, तर केवळ एका प्रकरणात न्यायालयीन कारवाई झाली. एवढ्या मोठ्या प्रमाणावर कारवाई होऊनही प्रकरणांची संख्या वाढत असल्याने दंडाची भीतीही या बेजबाबदार प्रवृत्तीला रोखू शकलेली नाही, हे आकडेवारीवरून स्पष्ट होते.

शॉर्टकटचा जीवघेणा अट्टहास
पादचारी पूल, भुयारी मार्ग किंवा अधिकृत मार्ग उपलब्ध असतानाही काही प्रवासी थेट रुळांवर उतरतात. धावती लोकल काही सेकंदांवर असतानाही रूळ ओलांडण्याचा प्रयत्न केला जातो. ही निष्काळजी क्षणात जीवघेणी ठरू शकते. अपघात झाल्यास त्याची झळ संबंधित व्यक्तीपुरती मर्यादित राहत नाही, तर लोकल सेवा विस्कळित होऊन हजारो प्रवाशांना त्याचा फटका बसतो.


महिनानिहाय प्रकरणे
जानेवारी - ४३८
फेब्रुवारी - ७९६
मार्च - ५६३
एप्रिल -३१२
मे -३४५
जून - १,४०७
जुलै - ४,५५०
एकूण - ८,४११

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Holiday: बँकेची कामं आजच करा! चार दिवस बँका राहणार बंद? कधी पासून जाणून घ्या

Duleep Trophy Final: ३० चौकार अन् ७ षटकार... ईशान किशन बरसला, पण त्रिशतक हुकलं; संघाच्या तब्बल ७०० धावा पार

MPSC Irregularities Issue : ‘एमपीएससी’ गैरप्रकारांविरोधात पुण्यात विद्यार्थ्यांचा आक्रोश; तीन दिवसांत दखल न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

Marathi News Live Updates: कोथरूड पोलीस स्टेशनच्या बाहेर कोथरूडकर एकवटले

कुंभ, मीन अन् मेष राशीच्या लोकांसाठी कसा असेल पुढचा काळ? शनीच्या साडेसातीपासून कधी मिळणार दिलासा?

SCROLL FOR NEXT