मुंबई

७९ नगरसेवक न्यायालयीन कचाट्यात

CD

७९ नगरसेवक न्यायालयीन कचाट्यात
पाच जणांची निवड बाद; निवडीला आव्हान
सकाळ वृत्तसेवा
​मुंबई, ता. ७ : महापालिका निवडणुकीतील विजयानंतरही लोकप्रतिनिधींची डोकेदुखी कायम आहे. उमेदवारांनी सादर केलेली जात प्रमाणपत्रे, संपत्तीची माहिती, गुन्हेगारी पार्श्वभूमी आणि प्रतिज्ञापत्रातील त्रुटी यावरून एकूण ७९ नगरसेवकांच्या निवडीला न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मागवलेल्या माहितीतून ही आकडेवारी समोर आली असून, माजी महापौर विशाखा राऊत यांचे नगरसेवकपद बाद झाल्याने हा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

एकूण ७९ याचिकांपैकी आतापर्यंत पाच नगरसेवकांची निवड न्यायालयाने रद्द ठरवली आहे. यामध्ये शिवसेना (ठाकरे गट) आणि ‘एमआयएम’चे प्रत्येकी दोन आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) एका नगरसेवकाचा समावेश आहे. ​केवळ मतदारांचा कौल मिळवणे पुरेसे नसून, उमेदवारी अर्जासोबत सादर केलेल्या माहितीची सत्यता तितकीच महत्त्वाची असल्याचे या घटनाक्रमांवरून स्पष्ट होते. मुंबई महापालिकेतील सर्वच प्रमुख राजकीय पक्षांचे नगरसेवक या न्यायालयीन कचाट्यात सापडले आहेत. उर्वरित याचिकांवर न्यायालयीन निर्णय काय असेल, यावर राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले असून, आणखी काही नगरसेवकांची पदे धोक्यात आल्यास महापालिकेतील पक्षीय संख्याबळ आणि राजकीय समीकरणांवर त्याचा थेट परिणाम होण्याची शक्यता आहे.

पक्षनिहाय दाखल याचिका व स्थिती
शिवसेना (ठाकरे गट) : २४ याचिका (२ नगरसेवक बाद)
​भाजप : १६ याचिका
काँग्रेस : १० याचिका
शिवसेना (शिंदे गट) : ७ याचिका
​एमआयएम : ५ याचिका (२ नगरसेवक बाद)
​मनसे : २ याचिका
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) : १ याचिका (१ नगरसेवक बाद)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs PAK: भारताविरुद्धच्या सामन्यानंतर पाकिस्तानी कर्णधाराला ICC कडून शिक्षा! शफाली वर्माला सेंडऑफ देणं पडलं महागात

अशोक सराफ की निवेदिता सराफ? भांडण झालं तर सगळ्यात आधी सॉरी कोण म्हणतं? अभिनेत्री म्हणाल्या- आम्ही...

Mangalwedha News : धनगर आरक्षणाची अंमलबजावणीसाठी ठोस कारवाई करा; धनगर समाजाच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन

Marathi News Live Updates: इंद्रायणी घाटावर तृतीयपंथीयांच्या दोन गटात मारामारी; गुन्हा दाखल

Thane News : सण उत्सवात ध्वनीप्रदुषण व अश्लीतेला थारा नको; डॉ. महेश बेडेकर यांचे राज्यातील नागरिकांना खुले पत्र

SCROLL FOR NEXT