मुंबई

भटके-विमुक्तांच्या इतिहासाचे दस्तऐवजीकरण गरजेचे

CD

भटके-विमुक्तांच्या इतिहासाचे दस्तऐवजीकरण गरजेचे
मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांचे प्रतिपादन

मुंबई, ता. ७ : भटके-विमुक्त समाजाचा इतिहास, अस्मिता, लोकसंस्कृती आणि पारंपरिक ज्ञानाचे व्यापक दस्तऐवजीकरण होण्याची गरज असून, विद्यापीठातील संशोधन समाजाच्या व्यापक हितासाठी आणि लोककल्याणासाठी उपयोगी ठरले पाहिजे, असे प्रतिपादन मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांनी सोमवारी (ता. ७) केले.

मुंबई विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्र आणि विमुक्त जाती व भटक्या जमाती संशोधन केंद्राच्या संयुक्त विद्यमाने कलिना संकुलातील नॅनो सायन्स सभागृहात आयोजित ‘भटके विमुक्त दिवस’ कार्यक्रमात ते अध्यक्ष स्थानावरून बोलत होते. या वेळी भटके विमुक्त कल्याणकारी संस्था, भंडारा येथील दिलीप चित्रिवेकर, विवेक पुस्तक प्रकाशन व समरसता साहित्य परिषदेचे संपादक रवींद्र गोळे आणि बी. एन. एन. महाविद्यालयाच्या माजी प्राचार्या सुवर्णा रावळ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्राचे संचालक प्रा. वाल्मिक सरवदे, विमुक्त जाती व भटक्या जमाती संशोधन केंद्राचे संचालक प्रा. सत्यनारायण कोठे आदी मान्यवर उपस्थित होते. विमुक्त जाती व भटक्या जमाती संशोधन केंद्राच्या स्थापनेमागील भूमिका स्पष्ट करताना कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांनी विद्यापीठाच्या ‘आऊटरिच’ उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले. विद्यापीठाचे ज्ञान आणि संशोधन समाजातील विविध घटकांपर्यंत पोहोचविण्यासोबतच सामाजिक प्रश्नांशी विद्यापीठाचा संवाद अधिक दृढ करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात प्रा. सत्यनारायण कोठे यांनी विमुक्त जाती व भटक्या जमाती संशोधन केंद्राची भूमिका आणि उद्दिष्टे स्पष्ट केली. भटके-विमुक्त समाजाचा इतिहास, संस्कृती, परंपरा, ज्ञान आणि सामाजिक योगदान यांचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास व दस्तऐवजीकरण करण्यास केंद्र प्राधान्य देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

गोंधळींच्या लोकसंस्कृतीवर डॉक्युड्रामा
‘भारतीय लोकसंस्कृतीचे रक्षक-उपासक : गोंधळी’ या विषयावर बोलताना प्रा. सुवर्णा रावळ यांनी गोंधळी, वैदू, भोई, रामोशी, बेरड आदी समाजांच्या पारंपरिक कौशल्यांचा आणि सामाजिक योगदानाचा इतिहासाच्या संदर्भात अभ्यास करण्याची गरज व्यक्त केली. लोकसंस्कृती आणि परंपरा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी त्यांनी तयार केलेला ‘गोंधळी’ विषयावरील डॉक्युड्रामा या वेळी खास प्रेक्षकांना दाखवण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kevin Pietersen: वर्ल्ड कपआधी इंग्लंडचा मास्टरप्लॅन! १२ वर्षांनंतर पीटरसनला दिली संघात एन्ट्री; पण नेमकी भूमिका काय?

Phulambri News : काँग्रेसच्या गांधी भवनात सत्तारांची अचानक ‘एन्ट्री’..! भेटीने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

IND vs PAK: भारताविरुद्धच्या सामन्यानंतर पाकिस्तानी कर्णधाराला ICC कडून शिक्षा! शफाली वर्माला सेंडऑफ देणं पडलं महागात

अशोक सराफ की निवेदिता सराफ? भांडण झालं तर सगळ्यात आधी सॉरी कोण म्हणतं? अभिनेत्री म्हणाल्या- आम्ही...

Mangalwedha News : धनगर आरक्षणाची अंमलबजावणीसाठी ठोस कारवाई करा; धनगर समाजाच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन

SCROLL FOR NEXT