औषध कंपन्यांना ‘एफडीए’चा दणका
११.४१ कोटींचा मुद्देमाल जप्त; २० गुन्हे दाखल
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ७ : नागरिकांच्या आरोग्याशी थेट संबंधित औषधांच्या दर्जाबाबत हलगर्जी करणाऱ्या उत्पादक आणि विक्रेत्यांना अन्न व औषध प्रशासनाने दणका दिला आहे. जून ते ऑगस्टदरम्यान राज्यात औषधनिर्मिती, विक्री, रक्तपेढ्या आणि संबंधित केंद्रांची तपासणी करताना मोठ्या प्रमाणावर नियमबाह्य बाबी समोर आल्या. या तीन महिन्यांत २,९०२ ठिकाणी तपासणी करून ८८० परवानाधारकांविरुद्ध कारवाई करण्यात आली.
अन्न व औषध प्रशासनाच्या या मोहिमेदरम्यान १०४ ठिकाणी झडती घेऊन ११ कोटी ४१ लाख रुपयांचा बेकायदा औषधे व सौंदर्यप्रसाधनांचा साठा ताब्यात घेण्यात आला. प्रकरणांच्या गांभीर्यानुसार २० गुन्हे दाखल करण्यात आले असून, २१ जणांना अटक करण्यात आली. उत्पादन केंद्रांच्या तपासणीत प्रशिक्षित मनुष्यबळाची कमतरता, उत्पादनाच्या कागदपत्रांची तपासणी, तपासणीतील त्रुटी तसेच मंजुरी नसलेल्या औषधांचे उत्पादन आढळले. काही रक्तपेढ्यांमध्ये रक्त संक्रमण अधिकाऱ्याची उपलब्धता, रक्तसाठ्याच्या नोंदी, तापमान नियंत्रण आणि उपकरणांच्या देखभालीबाबत गंभीर त्रुटी आढळल्या. औषधविक्री केंद्रांमध्ये औषधे देणे आणि मुदत संपलेली औषधे विक्रीसाठी ठेवणे, यांसारखेही प्रकार उघडकीस आले. गंभीर अथवा वारंवार नियमभंग करणाऱ्यांना नोटीस व सुनावणीची संधी देऊन परवाने निलंबित किंवा रद्द करण्यात आल्याचे ‘एफडीए’ने सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.