मुंबई

सीएसएमटी-सावंतवाडी एक्स्प्रेस आजपासून सेवेत

CD

सीएसएमटी-सावंतवाडी एक्स्प्रेस आजपासून सेवेत

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ७ : मुंबई आणि कोकणदरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आणखी एक रेल्वे सेवा उपलब्ध झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-सावंतवाडी रोड एक्स्प्रेसची नियमित दैनंदिन सेवा मंगळवारपासून (ता. ८) सुरू होत आहे. त्यामुळे मुंबईहून कोकणातील विविध भागांत जाणाऱ्या प्रवाशांना रात्रीच्या प्रवासाचा आणखी एक पर्याय मिळणार आहे. या गाडीचे उद्‍घाटन यापूर्वी झाले आहे. त्यानंतर आता रेल्वे प्रशासनाने तिची नियमित सेवा सुरू केली आहे.

गाडी क्रमांक १५०८७ सीएसएमटी-सावंतवाडी रोड एक्स्प्रेस दररोज रात्री ११.५५ वाजता सीएसएमटीहून सुटेल. पावसाळी वेळापत्रकानुसार २० ऑक्टोबरपर्यंत ही गाडी दुसऱ्या दिवशी दुपारी १.५० वाजता सावंतवाडी रोडला पोहोचेल. २१ ऑक्टोबरपासून पावसाळ्यानंतरच्या वेळापत्रकानुसार तिचे आगमन दुपारी २.१५ वाजता होईल. परतीची गाडी क्रमांक १५०८८ सावंतवाडी रोड-सीएसएमटी एक्स्प्रेस ९ सप्टेंबरपासून दररोज धावेल. २० ऑक्टोबरपर्यंत ती सावंतवाडी रोडहून सायंकाळी ५ वाजता, तर २१ ऑक्टोबरपासून सायंकाळी ५.२० वाजता सुटेल. दुसऱ्या दिवशी सकाळी ६.४० वाजता ती सीएसएमटीला पोहोचेल. दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ या २१ स्थानकांवर गाडीला थांबे देण्यात आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sugar price: साखर दरवाढीचा खेळ संपला! भाव कधी कमी होणार? सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी

अमरावतीतल्या 'त्या' वाघिणीचा अचानक मृत्यू, काही तांसापूर्वी वनविभागाने केलं होतं बेशुद्ध; नेमकं काय घडलं?

मोदी सरकार देणार स्वस्त भाड्याची घरं; शहरात राहणाऱ्यांसाठी मोठी योजना

हिरा ठाकूर यांचा काँग्रेस प्रवेश, भाजपाला मोठा धक्का; राजकीय वर्तुळात खळबळ

MPSC Paper Leak : ‘पुरावा दिल्यास क्षणभरही पदावर राहणार नाही’; एमपीएससीचे अध्यक्ष विवेक भीमनवार

SCROLL FOR NEXT