मुंबई

वांद्रे अपघातातील आरोपीचा जामीन फेटाळला

CD

वांद्रे अपघातातील आरोपीचा जामीन फेटाळला

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. ७ : वांद्रे येथे गेल्या आठवड्यात झालेल्या अपघातामध्ये आठ वर्षांच्या मुलाच्या मृत्यूप्रकरणी मुख्य आरोपी मेघा रावलचा (न्यूट्रिशनिस्ट) जामीन अर्ज सोमवारी (ता. ७) सत्र न्यायालयाने फेटाळून लावला.

न्यायालयीन कोठडीत रवानगी झाल्यानंतर रावलने जामिनासाठी अर्ज केला होता. तिने गाडी चालवताना मोबाईल फोन वापरत असल्याच्या आरोपाचे खंडन केले. याउलट या दुर्दैवी घटनेनंतर पतीला माहिती देण्यासाठी मोबाईलचा वापर केला होता, असा दावा तिने केला होता. दुसरीकडे अर्जदाराने आधीच एका साक्षीदाराला प्रभावित करण्याचा प्रयत्न केल्याचा दावा मृत पीडिताच्या कुटुंबीयांनी केला. सर्व पक्षकारांचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर सत्र न्यायालयाने शनिवारी निर्णय राखून ठेवला होता. तो निर्णय सोमवारी जाहीर केला आणि अर्जदार आरोपी रावलचा जामीन अर्ज फेटाळून लावला. वांद्रे पश्चिम येथील सेंट जॉन बाप्टिस्ट रोडवर ३० ऑगस्ट २०२६ला दुपारी दोनच्या सुमारास भरधाव इनोव्हा कारच्या धडकेत आठ वर्षांच्या अंश गुप्ता याचा मृत्यू झाला. याप्रकरणी ४५ वर्षीय न्यूट्रिशनिस्ट मेघा रावल यांना पोलिसांनी अटक केली आहे. रस्ता ओलांडत असताना आरोपीच्या गाडीने त्याला धडक दिली. त्याला जवळच्या रुगाणालयात नेण्यात आले; परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला, असेही पोलिसांनी म्हटले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अमरावतीतल्या 'त्या' वाघिणीचा अचानक मृत्यू, काही तांसापूर्वी वनविभागाने केलं होतं बेशुद्ध; नेमकं काय घडलं?

मोदी सरकार देणार स्वस्त भाड्याची घरं; शहरात राहणाऱ्यांसाठी मोठी योजना

हिरा ठाकूर यांचा काँग्रेस प्रवेश, भाजपाला मोठा धक्का; राजकीय वर्तुळात खळबळ

MPSC Paper Leak : ‘पुरावा दिल्यास क्षणभरही पदावर राहणार नाही’; एमपीएससीचे अध्यक्ष विवेक भीमनवार

Ketan Agarwal Case : केतनचा बाहेरच्या व्यक्तीमार्फत खून घडवून आणण्याचा विचार; पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल यांची माहिती

SCROLL FOR NEXT