५८७ घरे परत मिळणार की भाडे?
आपत्कालीन वापरासाठी राखीव सदनिकांवरून शिवशाही-पालिकेचा तिढा; शासनाची दखल
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ८ : मुंबई महापालिकेने शिवशाहीची घरे आपत्कालीन परिस्थितीतीसाठी लटकवून ठेवली असून, त्याचे भाडेही दिले जात नाही, ना डिपॉझिट देण्याबाबत कार्यवाही केली जात. त्याची राज्य सरकारच्या गृहनिर्माण विभागाने दखल घेतली असून, त्याबाबतची माहिती आणि किती भाडे थकीत आहे याची माहिती शिवशाहीकडून मागवली आहे. तसेच पालिकेकडेही त्याबाबत विचारणा केली आहे. त्यामुळे शिवशाहीची ५८७ घरे परत मिळणार की भाडे मिळणार, याकडे लक्ष लागले आहे.
आपत्कालीन परिस्थितीत बेघर झालेल्यांना तत्काळ घर देता यावे म्हणून स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून मुंबई महापालिकेने घरांची व्यवस्था करणे आवश्यक आहे, मात्र पालिकेने तसे न करता शिवशाही पुनर्वसन प्रकल्पाची तब्बल ५८७ घरे आपत्कालीन परिस्थितीसाठी उपलब्ध असल्याची माहिती तीन वर्षांपूर्वी उच्च न्यायालयाला दिली आहे. त्यामुळे ती घरे राखीव ठेवावी लागली आहेत, मात्र त्याबदल्यात पालिकेकडून शिवशाहीला भाडे, झिपाॅझिट दिले जात नसल्याने त्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत असल्या बाब समोर आली होती. त्याची राज्य सरकारने दखल घेत शिवशाही आणि पालिकेकडून सदर प्रकरणाची माहिती मागवल्याचे शिवशाहीच्या अधिकाऱ्याने सांगितले.
लाखो रुपयांची थकबाकी
शिवशाहीकडून खासगी विकसकांना दिल्या जाणाऱ्या सदनिकासाठी मासिक आठ हजार रुपये भाडे आणि तीन महिन्यांचे भाडे डिपॉझिट म्हणून घेतले जाते. त्याप्रमाणे गेल्या तीन वर्षांचा विचार करता सुमारे १४-१६ कोटी रुपये भाडे शिवशाहीला मिळणे अपेक्षित आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.