मुंबई

साक्षरतेसाठी ‘उल्लास’चा जागर

CD

साक्षरतेसाठी ‘उल्लास’चा जागर
अ‍ॅपवर निरक्षरांची नोंदणी वाढविण्याचे आवाहन

मुंबई, ता. ८ : राज्यातील निरक्षर नागरिकांना साक्षरतेच्या प्रवाहात आणण्यासाठी ‘उल्लास नव भारत साक्षरता कार्यक्रम’ प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. निरक्षर नागरिकांनी साक्षर होण्यासाठी ‘उल्लास’ अ‍ॅपवर आपले नाव नोंदवावे, तसेच समाजातील प्रत्येक घटकाने साक्षरतेच्या या अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहन शिक्षण संचालनालय (योजना) संचालक कृष्णकुमार पाटील यांनी केले आहे.
शिक्षण संचालनालय (योजना), महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्यामार्फत जिल्हा शिक्षण अधिकारी (योजना) यांच्या साप्ताहिक बैठकीत निरक्षरांची नोंदणी वाढविण्याबाबत सातत्याने आढावा घेण्यात येत असून, अधिकाधिक निरक्षर नागरिकांची ‘उल्लास’ अ‍ॅपवर नोंदणी करण्याच्या सूचना देण्यात येत आहेत. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० मधील शिफारशी तसेच संयुक्त राष्ट्रांच्या शाश्वत विकास ध्येयांनुसार वर्ष २०३० पर्यंत सर्व तरुण आणि प्रौढ महिला-पुरुषांना साक्षरता व संख्याज्ञानाचे मूलभूत कौशल्य प्राप्त करून देण्याचे उद्दिष्ट आहे. महाराष्ट्रात या उद्दिष्टाच्या पूर्ततेसाठी ‘उल्लास नव भारत साक्षरता कार्यक्रम’ राबविण्यात येत असल्याचे संचालकांनी सांगितले. या कार्यक्रमांतर्गत केवळ वाचन, लेखन आणि संख्याज्ञान एवढ्यापुरतेच शिक्षण मर्यादित न ठेवता आर्थिक साक्षरता, कायदेविषयक साक्षरता, डिजिटल साक्षरता, आपत्ती व्यवस्थापन कौशल्य, आरोग्यविषयक जागरूकता, बालसंगोपन व शिक्षण, कुटुंब कल्याण, मूलभूत शिक्षण, स्थानिक रोजगाराच्या संधी तसेच पुनर्कौशल्य व उच्च कौशल्य यांसारख्या व्यावसायिक कौशल्यांवरही भर देण्यात येणार आहे.


शाळा हे अंमलबजावणीचे प्रमुख केंद्र
महाराष्ट्र शासनाने केंद्र पुरस्कृत ‘उल्लास नव भारत साक्षरता कार्यक्रम’ स्वीकारला असून, शासन निर्णयानुसार राज्य, जिल्हा, गट आणि शाळास्तरावर समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी शाळा हे प्रमुख एकक राहणार आहे. शाळांमार्फत लाभार्थी निरक्षर व्यक्ती तसेच स्वयंसेवी शिक्षकांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. ज्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबात निरक्षर व्यक्ती नाहीत, अशा विद्यार्थ्यांनाही त्यांच्या परिसरातील निरक्षरांना साक्षर करण्यासाठी प्रोत्साहित केले जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

२८ वर्षांनंतर भारतीय क्रिकेट इतिहासात घडणार दुर्मिळ क्षण? एकाच दिवशी दोन देशात कसे खेळणार भारतीय संघ

Vadodara Mumbai Expressway : महाराष्ट्रातून दिल्ली अन् जयपूर गाठणे होणार सोपे! वडोदरा-मुंबई एक्सप्रेसवेचा 'हा' मार्ग वाहतुकीसाठी सज्ज; PM मोदींच्या हस्ते उद्घाटन

नालासोपारा ZP शाळेत कुकरचा स्फोट; भडका उडताच गरम खिचडी चिमुकल्यांच्या अंगावर; 2 विद्यार्थ्यांसह महिला जखमी

नारकरांच्या घरी झाली सत्यनारायण पूजा; ऐश्वर्या यांनी स्वतः बनवला प्रसादाचा शिरा, कशी केली तयारी? दाखवला खास व्हिडिओ

Hartalika 2026: हरतालिकेच्या दिवशी ‘या’ 3 राशींवर होणार महादेव पार्वतीची विशेष कृपा; धनलाभाचे संकेत

SCROLL FOR NEXT