मुंबई

गिरणी कामगारांचे उपोषण दुसऱ्या दिवशीही सुरूच!

CD

गिरणी कामगारांचे उपोषण दुसऱ्या दिवशीही सुरूच!

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ८ : मुंबईतील सर्व बंद एनटीसी गिरण्यांसमोर राष्ट्रीय मिल मजूर संघाचे आंदोलन मंगळवारी (ता. ८) दुसऱ्या दिवशीही सुरू आहे. कामगार नेते आणि महाराष्ट्र विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहीर यांनी केंद्र सरकारशी एनटीसी मिल प्रश्नांवर केलेल्या सकारात्मक चर्चेच्या अनुषंगाने हा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी कामगारांनी केली आहे.

‘एनटीसी’चे कार्यकारी अधिकारी कुमकुम राजू यांनी या प्रश्नांवर चर्चेची तयारी दाखवली; परंतु सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांनी जोपर्यंत गिरणी कामगारांना थकीत पगार मिळण्याबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाणार नाही, तोपर्यंत उपोषण आंदोलन चालूच राहील, अशी ठाम भूमिका घेतली. टाटा मिल, इंदू मिल क्रमांक पोद्दार आणि दिग्विजय या एनटीसीच्या चारही गिरण्यांच्या प्रवेशद्वारासमोर गिरणी कामगारांनी उपोषण सुरू ठेवले. राष्ट्रीय मिल मजूर संघाचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते, खजिनदार निवृत्ती देसाई, उपाध्यक्ष अण्णा शिर्सेकर, बजरंग चव्हाण, सुनील बोरकर, सेक्रेटरी शिवाजी काळे यांच्या नेतृत्वाखाली हे बेमुदत साखळी उपोषण सुरू आहे. संघटन सचिव दीपक राणे, गजानन कदम, बबन आसवले, प्रकाश भोसले, मोहन पोळ, एम. पी. पाटील, सुरेश मोरे इत्यादी पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी या उपोषणात सहभाग घेतला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

२८ वर्षांनंतर भारतीय क्रिकेट इतिहासात घडणार दुर्मिळ क्षण? एकाच दिवशी दोन देशात कसे खेळणार भारतीय संघ

नालासोपारा ZP शाळेत कुकरचा स्फोट; भडका उडताच गरम खिचडी चिमुकल्यांच्या अंगावर; 2 विद्यार्थ्यांसह महिला जखमी

नारकरांच्या घरी झाली सत्यनारायण पूजा; ऐश्वर्या यांनी स्वतः बनवला प्रसादाचा शिरा, कशी केली तयारी? दाखवला खास व्हिडिओ

Hartalika 2026: हरतालिकेच्या दिवशी ‘या’ 3 राशींवर होणार महादेव पार्वतीची विशेष कृपा; धनलाभाचे संकेत

Marathi News Live Updates : महाकाळा परिसरात मराठा आंदोलकांचा रास्ता रोको

SCROLL FOR NEXT