मुंबई

३५ डॉक्टरांना कारणे दाखवा नोटीस

CD

३५ डॉक्टरांना कारणे दाखवा नोटीस
हजेरीत अनियमितता आढळल्याने कारवाई
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ८ : कूपर रुग्णालयाच्या आधिपत्याखाली कार्यरत असलेल्या ट्रॉमा केअर रुग्णालयातील ३५ डॉक्टरांच्या बायोमेट्रिक हजेरीत अनियमितता आढळून आल्याने रुग्णालय प्रशासनाने संबंधित डॉक्टरांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. नोटीस बजावण्यात आलेल्या डॉक्टरांमध्ये व्याख्याते, सल्लागार तसेच बंधपत्रित डॉक्टरांचा समावेश आहे.

रुग्णालय प्रशासनाने बायोमेट्रिक हजेरीच्या नोंदी तपासल्यानंतर अनेक डॉक्टरांच्या हजेरीमध्ये केवळ एकच ठसा (पंच) नोंदवला गेल्याचे, प्रवेश आणि बाहेर पडण्याची पूर्ण नोंद उपलब्ध नसल्याचे तसेच हजेरी नोंदविण्याच्या प्रक्रियेत अनियमितता आढळल्याचे समोर आले आहे. त्यामुळे प्रशासनाने ३५ डॉक्टरांकडून याप्रकरणी स्पष्टीकरण मागविले आहे. या नोटिसीनुसार संबंधित डॉक्टरांना ४८ तासांच्या आत हजेरीतील अनियमिततेचे कारण स्पष्ट करून आपले म्हणणे मांडण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. आवश्यक असल्यास त्यासोबत संबंधित कागदपत्रेही सादर करण्यास सांगण्यात आले आहे. ट्रॉमा रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. छाया शिंदे यांनी सांगितले की, ‘वरिष्ठांच्या आदेशानुसार प्रत्येक कर्मचाऱ्याची बायोमेट्रिक हजेरी तपासली जात आहे. ज्या डॉक्टरांची हजेरी योग्य आढळली नाही त्यांना कारणे दाखवा नोटीस देण्यात आली आहे. त्यांच्या स्पष्टीकरणानंतर पुढील कार्यवाही केली जाईल.’ दरम्यान, काही डॉक्टरांनी मात्र आपली बाजू मांडताना गुंतागुंतीच्या रुग्णांच्या उपचारासाठी नियमित वेळेपेक्षा अधिक काळ रुग्णालयात काम केल्याचा दावा केला आहे. रात्रीच्या ड्युटीनंतरही गंभीर रुग्णांवर उपचार करण्यासाठी रुग्णालयात थांबावे लागत असल्याने बायोमेट्रिक नोंदींमध्ये काही त्रुटी राहिल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

अनुपस्थितीचा मुद्दा ऐरणीवर
रुग्णालयाशी संबंधित सूत्रांच्या माहितीनुसार, ‘काही डॉक्टर रुग्णालयात केवळ एकदा हजेरी नोंदवून त्यानंतर रुग्णालयाबाहेर जात असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. काही डॉक्टर बाहेर खासगी व्यवसायासाठी जात असल्याचा संशयही व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे डॉक्टरांच्या प्रत्यक्ष उपस्थितीबाबत प्रशासनाने अधिक कठोर भूमिका घेतली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

२८ वर्षांनंतर भारतीय क्रिकेट इतिहासात घडणार दुर्मिळ क्षण? एकाच दिवशी दोन देशात कसे खेळणार भारतीय संघ

नालासोपारा ZP शाळेत कुकरचा स्फोट; भडका उडताच गरम खिचडी चिमुकल्यांच्या अंगावर; 2 विद्यार्थ्यांसह महिला जखमी

नारकरांच्या घरी झाली सत्यनारायण पूजा; ऐश्वर्या यांनी स्वतः बनवला प्रसादाचा शिरा, कशी केली तयारी? दाखवला खास व्हिडिओ

Hartalika 2026: हरतालिकेच्या दिवशी ‘या’ 3 राशींवर होणार महादेव पार्वतीची विशेष कृपा; धनलाभाचे संकेत

Marathi News Live Updates : महाकाळा परिसरात मराठा आंदोलकांचा रास्ता रोको

SCROLL FOR NEXT