वीजचोरांची नावे होणार सार्वजनिक
किंवा
वीजचोरांना महावितरणचा ‘शॉक’
नाव-पत्ता होणार सार्वजनिक
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ८ : ठाणे, नवी मुंबई, पुण्यासारख्या शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातही वीजचोरीचे प्रमाण मोठे आहे. त्याला चाप लावण्यासाठी महावितरणने नामी शक्कल लढवली आहे. त्यानुसार वीजचोरी आढळल्यास संबंधित वीजचोराचे नाव सार्वजनिक करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे बदनामीच्या भीतीने वीजचोरीच्या घटना कमी होतील, असा महावितरणचा कयास आहे.
वीजचोरीमुळे महावितरणच्या महसुली नुकसानीचा भार प्रामाणिकपणे वीजदेयक भरणाऱ्या ग्राहकांवर पडतो. त्यामुळे यापुढे वीजचोरी सापडल्यास महावितरण आपल्या पद्धतीने ‘शॉक’ देणार आहे. वीजचोरी करणाऱ्या ग्राहकाचे नाव आणि पत्ता सार्वजनिक करण्यात येणार आहे. वीजचोरीमुळे महावितरणचे महसुली नुकसान होत असून, त्यासोबत शॉर्टसर्किट, रोहित्र भार वाढल्याने नादुरुस्त होणे, आगीच्या घटना घडण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्याची दखल घेत महावितरणने वीजचोराचे नाव सार्वजनिक करण्याचे ठरविले आहे. त्याबाबतचे निर्देश महावितरणचे संचालक (संचलन) धनंजय औंढेकर यांनी नुकतेच वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले आहेत. वीजचोरी हा सामाजिक अपराध आहे, अनेकदा वीजचोरी करतेवेळी प्राणांतिक अपघात झाले आहेत. वीजचोरी करणाऱ्या ग्राहकांनी अनधिकृत वीजजोडणी अधिकृत करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.