मुंबई

शिवनेरी परिसरातील संरचनांची होणार पडताळणी

CD

‘शिवनेरी’ परिसरातील संरचनांची होणार पडताळणी
सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशीष शेलार यांचे निर्देश
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ८ : शिवनेरी किल्ल्याचे ऐतिहासिक व जागतिक वारसा मूल्य लक्षात घेता किल्ला परिसरातील अनधिकृत बांधकामे, कबर व दर्ग्यांसह अन्य संरचनांबाबत तातडीने वस्तुनिष्ठ तपासणी करून कार्यवाही करण्याचे निर्देश सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशीष शेलार यांनी मंगळवारी (ता. ८) प्रशासनाला दिले.

शिवनेरी किल्ला व त्याच्या परिसरातील स्थितीबाबत मंत्री ॲड. शेलार यांच्या अध्यक्षतेखाली संबंधित जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाचे अधिकारी, पुरातत्त्व विभाग, तहसीलदार तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी यांची आढावा बैठक झाली. माजी खासदार किरीट सोमय्या यांनी या संपूर्ण परिसराला भेट देऊन पाहणी करून यातील काही गंभीर बाबी शासनाच्या निदर्शनास आणून दिल्या होत्या. त्यानुसार ही बैठक घेण्यात आली होती. शिवनेरी किल्ला हा जागतिक वारसा वारशाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असून, संबंधित वारसा वास्तूच्या संरक्षित व बफर झोनमध्ये कोणत्याही प्रकारचे अनधिकृत बांधकाम अथवा संरचना उभारली जाणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना मंत्री ॲड. शेलार यांनी दिल्या. किल्ला परिसरातील कबर, दर्गा तसेच इतर संरचना नेमक्या कोणत्या कालखंडात निर्माण झाल्या, त्याबाबत महसूल अभिलेख, उपलब्ध ऐतिहासिक दस्तऐवज तसेच आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने वस्तुनिष्ठ अहवाल तयार करण्याचे निर्देश संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. या संरचना पूर्वीपासून अस्तित्वात होत्या की अलीकडच्या काळात निर्माण करण्यात आल्या, याची निश्चित पडताळणी करण्याच्या सूचना मंत्री शेलार यांनी दिल्या.

‘नेत्रम’ ॲपच्या माध्यमातून संरचनांची तपासणी
संबंधित तपासणीसाठी केंद्र सरकारच्या ‘नेत्रम’ ॲपचा वापर करण्याचे निर्देश देण्यात आले. उपग्रह छायाचित्रांच्या आधारे एखादी संरचना कोणत्या कालावधीपासून अस्तित्वात आहे, याबाबत माहिती मिळविण्यासाठी या तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात येणार आहे. राज्य शासनाच्या ‘महास्टॅट’ यंत्रणेशी समन्वय साधून उपलब्ध तांत्रिक माहितीचा वापर करून संरचनांची कालानुक्रमिक पडताळणी करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.

..
शिवनेरी किल्ला हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाशी निगडित असलेला अत्यंत महत्त्वाचा वारसा आहे. त्याचे पुरातत्त्वीय आणि जागतिक वारसा मूल्य अबाधित ठेवणे ही सर्व संबंधित यंत्रणांची सामूहिक जबाबदारी आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या अनधिकृत बांधकामाकडे दुर्लक्ष केले जाणार नाही.
- आशीष शेलार, सांस्कृतिक कार्यमंत्री

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

२८ वर्षांनंतर भारतीय क्रिकेट इतिहासात घडणार दुर्मिळ क्षण? एकाच दिवशी दोन देशात कसे खेळणार भारतीय संघ

Vadodara Mumbai Expressway : महाराष्ट्रातून दिल्ली अन् जयपूर गाठणे होणार सोपे! वडोदरा-मुंबई एक्सप्रेसवेचा 'हा' मार्ग वाहतुकीसाठी सज्ज; PM मोदींच्या हस्ते उद्घाटन

नालासोपारा ZP शाळेत कुकरचा स्फोट; भडका उडताच गरम खिचडी चिमुकल्यांच्या अंगावर; 2 विद्यार्थ्यांसह महिला जखमी

नारकरांच्या घरी झाली सत्यनारायण पूजा; ऐश्वर्या यांनी स्वतः बनवला प्रसादाचा शिरा, कशी केली तयारी? दाखवला खास व्हिडिओ

Hartalika 2026: हरतालिकेच्या दिवशी ‘या’ 3 राशींवर होणार महादेव पार्वतीची विशेष कृपा; धनलाभाचे संकेत

SCROLL FOR NEXT