मुंबई

बंदर प्रकल्पांचा वेग वाढवा! - कामात दिरंगाई नको; गुंतवणुकीसाठी उद्योजकांना महाराष्ट्रात आणा - नितेश राणे

CD

बंदर प्रकल्पांचा वेग वाढवा!
गुंतवणुकीसाठी उद्योजकांना महाराष्ट्रात आणा ः नितेश राणे
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ८ : राज्यातील बंदर विकासाच्या विविध प्रकल्पांना गती देऊन ते निर्धारित कालमर्यादेत पूर्ण करण्यासाठी प्रभावी नियोजन करावे, अशा सूचना मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी आज अधिकाऱ्यांना दिल्या. बंदर विकासाच्या माध्यमातून रोजगारनिर्मिती आणि गुंतवणुकीला चालना देण्याच्या दृष्टीने प्रकल्पांची अंमलबजावणी गतिमान करण्यावर त्यांनी भर दिला.
मंत्रालयातील समिती कक्षात झालेल्या बैठकीत राणे यांनी बंदरे विभागातील विविध प्रकल्पांचा सविस्तर आढावा घेतला. प्रत्येक प्रकल्पाचे नियोजन आणि अंमलबजावणी निर्धारित वेळेत पूर्ण करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. राज्यात बंदरनिर्मिती आणि विकासासाठी मोठ्या संधी आहेत. या क्षेत्राच्या विस्तारातून रोजगारनिर्मिती तसेच गुंतवणुकीला चालना मिळू शकते. त्यामुळे बंदर विकास क्षेत्रात कार्यरत असलेल्या अन्य राज्यांतील उद्योजकांशी संवाद साधून महाराष्ट्रात गुंतवणूक वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत, असे राणे यांनी सांगितले.

मुंबई वॉटर मेट्रोचा आढावा
बैठकीत मुंबई वॉटर मेट्रो प्रकल्पाच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यात आला. प्रकल्पाची कामे जलद गतीने पूर्ण करण्यासाठी आवश्यक कार्यवाही तातडीने करण्याच्या सूचना राणे यांनी दिल्या. रेडिओ क्लब जेट्टीच्या सद्यःस्थितीबाबतही चर्चा करून संबंधित बाबींचा आढावा घेण्यात आला.

शासकीय प्रक्रिया अधिक गतिमान करणार
योजना व सेवांच्या शासकीय प्रक्रियेची पुनर्रचना (जीपीआर) अंतर्गत विविध योजना व सेवांची प्रक्रिया अधिक सुलभ आणि गतिमान करण्याबाबत बैठकीत चर्चा झाली. नागरिकांना आणि संबंधित घटकांना सेवा अधिक कार्यक्षमतेने उपलब्ध करून देण्यासाठी प्रक्रियेत आवश्यक सुधारणा करण्यावर भर देण्यात आला. बैठकीस बंदरे विभागाचे अपर मुख्य सचिव संजय सेठी, महाराष्ट्र सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप पी. यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भारतात पेट्रोल-डिझेलचे दर पुन्हा वाढणार? कच्चा तेलाच्या किंमती १०० डॉलरच्या पार...

Pune News : दहीहंडीत नियमांचे उल्लंघन; आणखी नऊ गुन्हे दाखल; मंडळाच्या १६ पदाधिकाऱ्यांचा समावेश

Tata Punch: 'टाटा पंच' गाडीचा नवा विक्रम! 'या' कारला टाकलं मागे, देशात पहिल्या क्रमांकाची पसंती; काय आहे खास?

Marathwada Irrigation Demand: खरीप पिकांना जीवदानासाठी सिद्धेश्वर, येलदरी धरणातून तातडीने पाणी सोडा; आमदार राजू नवघरे यांची जलसंपदा मंत्र्याकडे मागणी

Dancer Aishwarya Jadhav : अश्लील नृत्याला परवानगी देऊ नका; मात्र कलेचा आदर करणाऱ्यांना परवानगी द्या

SCROLL FOR NEXT