मुंबई

अदाणी एअरपोर्टमध्ये एक अब्ज डॉलर गुंतवणूक

CD

अदाणी एअरपोर्टमध्ये
एक अब्ज डॉलर गुंतवणूक

मुंबई, ता. ९ : अदाणी एअरपोर्ट होल्डिंग्स लिमिटेडकडून अल्फा वेव्ह ग्लोबल, टेमासेक, प्रेमजी इन्व्हेस्ट आणि सेव्हन ब्लॅकरॉकद्वारे व्यवस्थापित निधीसह जागतिक आणि देशांतर्गत गुंतवणूकदारांच्या समूहाकडून सुमारे एक अब्ज अमेरिकी डॉलरचे (९,८२५ कोटी रुपये) नवीन भागभांडवल उभारले जाणार आहे.  या गुंतवणुकीपूर्वी कंपनीचे मूल्यांकन सुमारे १८ अब्ज अमेरिकी डॉलर इतके करण्यात आले आहे. 

कंपनीची ही निधी उभारणी योजना भारतातील विमानतळ पायाभूत सुविधा क्षेत्रात वित्तीय संस्थांकडून होणाऱ्या सर्वात मोठ्या प्राथमिक भागभांडवल गुंतवणुकीपैकी एक आहे. यामुळे अदाणी एअरपोर्टचे संस्थात्मक मूल्यांकन चांगले होईल. देशाच्या विमान वाहतूक बाजारपेठेत प्रवाशांची संख्या आणि विमानतळांची क्षमता या दोन्हींमध्ये वाढ होण्याची अपेक्षा असताना येणारी ही गुंतवणूक अदाणी एअरपोर्टसाठी अत्यंत महत्त्वाची आहे,  असे अदाणी एअरपोर्टचे बिगर कार्यकारी संचालक जीत अदाणी यांनी सांगितले.
गुंतवणूकदारांनी अदाणी एअरपोर्टसोबत तीन टप्प्यांत नवीन भागभांडवल खरेदी करण्यासाठी बंधनकारक करार केले आहेत. या व्यवहाराचा अंतिम टप्पा जुलै २०२७ पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. तिन्ही टप्पे पूर्ण झाल्यानंतर गुंतवणूकदारांच्या या समूहाची अदाणी एअरपोर्टमध्ये एकत्रितपणे सुमारे ५.५४ टक्के हिस्सेदारी असेल.  या निधीचा वापर अदाणी एअरपोर्टच्या विमानतळ पायाभूत सुविधांचा विस्तार आणि आधुनिकीकरण, एकात्मिक विमानतळ-शहर परिसर विकसित करणे तसेच ‘ग्राउंड हँडलिंग’सह प्रवाशांशी थेट संबंधित आणि गैर-विमानन व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी करण्यात येणार आहे.

अदाणी एअरपोर्टच्या विमानतळ-शहर विकास योजनेच्या पहिल्या टप्प्यात सुमारे २.२ कोटी चौरस फूट क्षेत्रफळाच्या मिश्र-वापर प्रकल्पांचा विकास करण्याची योजना आहे. या गुंतवणुकीमुळे वार्षिक सुमारे २० कोटी प्रवाशांना सेवा देण्याची क्षमता वाढण्याची अपेक्षा आहे. तसेच व्यावसायिक महसूल आणि प्रवासी सेवांचाही विस्तार करण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Duleep Trophy: तिलक वर्मा ९९ धावांवर आऊट अन् मग वैभव सूर्यवंशी, ईशान किशनसह पूर्व विभागानं जे केलं, त्यानं जिंकली कोट्यवधींची मनं!; Video

CSMT Redevelopment : सीएसएमटीचा ‘वर्ल्ड हेरिटेज’ दर्जा; पुनर्विकासाने मात्र रेल्वेचीच कोंडी! प्लॅटफॉर्म १६-१७ सात महिन्यांपासून बंद, आता १४-१५ ताब्यात देण्याची मागणी

Marathi News Live Updates : मुख्यमंत्री झाल्यानंतर विजय यांचा पहिलाच परदेश दौरा

MLA Manoj Kayande : सिंदखेड राजा मतदारसंघांमध्ये कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

Pune News : विद्यानंद बापट हल्ला प्रकरणातील संतोष चव्हाणचा जामीन न्यायालयाने फेटाळला

SCROLL FOR NEXT