गणेशोत्सवातून अवयवदानाचा संदेश
शाळा, महाविद्यालयांतही जनजागृती
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ९ : गणेशोत्सवाच्या काळात मुंबईत विविध सामाजिक विषयांवर जनजागृती केली जात असताना यंदा अवयवदानाचा मुद्दाही नागरिकांपर्यंत पोहोचवला जाणार आहे. अवयवदानासंदर्भातील गैरसमज दूर करणे, योग्य माहिती देणे आणि कुटुंबीयांमध्ये याबाबत संवाद वाढवणे, यासाठी ‘ऑर्गन्स ऑफ होप’ हा उपक्रम राबवण्यात येणार आहे.
अवयवदानाचा निर्णय अनेकदा कुटुंबीयांसाठी कठीण ठरतो. त्यामुळे अवयवदानाबाबतची भूमिका आणि इच्छा याविषयी कुटुंबीयांशी आधीच चर्चा करणे महत्त्वाचे मानले जाते. याच मुद्द्यांवर गणेशोत्सवाच्या काळात नागरिकांशी संवाद साधला जाणार आहे.
विद्यार्थ्यांच्या माध्यमातून अवयवदानाविषयीची माहिती त्यांच्या कुटुंबांपर्यंत पोहोचवण्यावरही भर दिला जाणार आहे. परळ येथील ग्लेनईगल्स रुग्णालयाच्या पुढाकारातून हा उपक्रम राबवला जात आहे. अवयवदानाचा विषय केवळ वैद्यकीय क्षेत्रापुरता मर्यादित न राहता त्यावर कुटुंब आणि समाजाच्या पातळीवर चर्चा होणे आवश्यक असल्याचे या उपक्रमाच्या आयोजकांचे म्हणणे आहे.
जनजागृतीपर सत्रे
या जनजागृती उपक्रमात लालबागचा राजा, झेडटीसीसी, रोटो-सोटो, व्हीएमआरटी फाउंडेशन यांच्यासह विविध संस्था आणि महाविद्यालये सहभागी होणार आहेत. सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या उपक्रमांबरोबरच शाळा आणि महाविद्यालयांमध्ये जनजागृतीपर सत्रे, विविध कार्यक्रम आणि अवयवदान प्रतिज्ञा उपक्रम आयोजित केले जाणार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.