मुंबई

टिटवाळा ब्लॉकचा आज अखेरचा टप्पा

CD

टिटवाळा ब्लॉकचा आज अखेरचा टप्पा
मध्यरात्री तीन तासांचा ब्लॉक; अनेक फेऱ्या रद्द

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ९ : टिटवाळा स्थानकातील १५ डब्यांच्या लोकलसाठी फलाट विस्ताराच्या कामाचा अंतिम टप्पा गुरुवारी (ता. १०) मध्यरात्री पार पडणार आहे. यासाठी रात्री १.४५ ते पहाटे ४.४५ या तीन तासांत अप आणि डाऊन मार्गावर विशेष वाहतूक व पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे कसारा मार्गावरील लोकल वाहतुकीसह काही मेल-एक्स्प्रेस गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे.

ब्लॉकच्या कालावधीत टिटवाळ्यापर्यंत धावणाऱ्या काही लोकल आसनगावपर्यंत वाढविण्यात येतील, तर टिटवाळ्याहून सुटणाऱ्या काही सेवा आसनगावहून सुरू करण्यात येतील. सीएसएमटीहून रात्री १०, ११.१६ आणि ११.४२ वाजता सुटणाऱ्या टिटवाळा लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. रात्री १२.०८ वाजताची कसारा लोकल आणि रात्री ८.५६ वाजताची आसनगाव लोकलही रद्द राहणार आहे. याशिवाय ठाणे, कुर्ला आणि इतर स्थानकांहून सुटणाऱ्या काही फेऱ्यांवरही परिणाम होणार आहे. टिटवाळ्याहून सीएसएमटीकडे जाणाऱ्या पहाटे ४.३२, सकाळी ६.१३ आणि रात्री १०.०६ वाजताच्या लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. ठाणे, कल्याण आणि टिटवाळा येथून सुटणाऱ्या काही अन्य लोकलही रद्द राहणार आहेत. ब्लॉकपूर्वी सीएसएमटीहून रात्री १०.४७ वाजता सुटणारी कसारा लोकल शेवटची असेल. कसाऱ्याहून सीएसएमटीकडे येणारी रात्री १० वाजताची लोकलही ब्लॉकपूर्वीची शेवटची सेवा असेल. ब्लॉकनंतर सीएसएमटीहून पहाटे ४.१९ वाजता कसाऱ्याकडे लोकल सुटेल. प्रवाशांच्या सोयीसाठी सीएसएमटीहून मध्यरात्री १२.०८ वाजता ठाण्यासाठी विशेष लोकल चालविण्यात येणार आहे. तसेच आसनगावहून सकाळी ८.०२ वाजता परळसाठी विशेष लोकल सोडण्यात येणार आहे.

एक्स्प्रेस गाड्यांचे नियमन
बलिया-दादर एक्स्प्रेस, ज्ञानेश्वरी एक्स्प्रेस, हावडा-सीएसएमटी मेल, गोरखपूर-एलटीटी एक्स्प्रेस आणि साईनगर शिर्डी-दादर एक्स्प्रेससह काही गाड्यांचे वासिंद, आटगाव, खर्डी, कसारा आणि इगतपुरी येथे नियमन करण्यात येणार आहे. विदर्भ एक्स्प्रेस, देवगिरी एक्स्प्रेस, पंजाब मेल आणि दुरंतो एक्स्प्रेससह सहा गाड्या गंतव्यस्थानी ३० ते ४० मिनिटे उशिराने पोहोचण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Marks Verification : एमपीएससी उमेदवारांसाठी मोठी बातमी! गुणपडताळणीसाठी अर्जाची संधी; जाणून घ्या अंतिम तारीख

सौदी अरेबियाच्या संरक्षणासाठी पाकिस्तान 'येमेन'मधील हुथी बंडखोरांवर एअरस्ट्राईक करण्याच्या तयारीत; करार काय सांगतो?

Karmad News : आईच्या मामाच्या गावाला आलेल्या एकुलत्या एक मुलाचा शेततळ्यात बुडून मृत्यू

EPF Advance Rules : पीएफ खात्यातून पैसे काढायचे आहेत? आधी समजून घ्या नियम, कोणाला किती रक्कम मिळणार?

Marathi News Live Updates : बालासोरच्या जंगलातून सुखरूप वाचवण्यात आलेल्या पाच ओरंगुटानच्या पिल्लांना भुवनेश्वरमधील नंदनकानन प्राणीसंग्रहालयात

SCROLL FOR NEXT