मुंबई

आरोपी पळून जाण्यास पोलिसच जबाबदार

CD

रुग्णालयातील मारहाण प्रकरण

आरोपी पळून जाण्यास
पोलिसच जबाबदार

उच्च न्यायालयाचे पालघर पोलिसांना खडे बोल

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ९ : पालघरस्थित खासगी रुग्णालयात जखमी गोविंदावर उपचार करताना शिंदे गटाच्या शिवसैनिकांनी रुग्णालय कर्मचाऱ्यांना केलेल्या मारहाण प्रकरणातील आरोपी पोलिसांच्या कारवाईतील दिरंगाई आणि निष्काळजीमुळे पळून गेले. पालघर पोलिसांनीच त्यांना पळून जाण्याची संधी दिल्याचे ताशेरे बुधवारी (ता. ९) उच्च न्यायालयाने ओढले.

रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांवर हल्ला होतो, अशा संवेदनशील प्रकरणात पोलिसांनी कोणताही तपास केलेला नाही, हे अस्वीकारार्ह असल्याचे निरीक्षण न्या. अजय गडकरी आणि न्या. कमल खाता यांच्या खंडपीठाने नोंदवले. डोंबवलीस्थित महापालिका रुग्णालयात शिंदेंच्या शिवसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी डॉक्टरांवर केलेल्या हल्ल्याचे प्रकरण ताजे असताना त्या घटनेतून पालघर पोलिसांनी काहीही धडा घेतला नाही, असे खडे बोलही न्यायालयाने सुनावले. तसेच ठाणे जिल्ह्यातील प्रकरणाची न्यायालयाने स्वतःहून दखल घेतली आहे. आता पालघर जिल्ह्यासाठी नव्याने स्वतःहून याचिका दाखल करू का, ठाणे जिल्ह्यात घडलेली घटना पुरेशी नव्हती का, ठाणे प्रकरणातून पोलिसांनी कोणताही धडा घेतला नाही का, अशी प्रश्नांची सरबत्ती न्यायालयाने केली. पालघर पोलिसांना या प्रकरणाचा तपास करण्यात रस नसल्यास तसे सांगावे. आम्ही हे प्रकरण मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे सोपवू, असा इशाराही न्यायालयाने दिला.
...
तपासावर प्रश्नचिन्ह!
प्राथमिक माहिती अहवालात नाव असलेल्या दहा जणांपैकी शिवसेनेचा शहरप्रमुख राहुल घरत अटकेत असून तो पोलिस कोठडीत आहे. उर्वरित नऊ आरोपी फरार असून सात निनावी व्यक्तींविरोधात तक्रार करण्यात आल्याची माहिती पालघरचे पोलिस अधीक्षक यतीश देशमुख यांनी न्यायालयाला दिली. गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी तातडीने का कारवाई केली नाही, फरार नऊ आरोपींची ओळख पटलेली असताना त्यांचा शोध का घेतला नाही, असे प्रश्न उपस्थित करून पोलिसांच्या निष्काळजीमुळेच आरोपी फरार झाले, असे खडे बोल न्यायालयाने सुनावले.
------
केस डायरीवरूनही फटकारले
पोलिसांनी ‘प्रकरण नोंदवही (केस डायरी) योग्य पद्धतीने न ठेवण्यावरूनही न्यायालयाने पोलिसांवर ताशेरे ओढले. पोलिस महासंचालकांनी केस डायरी नियमित ठेवण्याचे आदेश दिले असतानाही पोलिस त्याच्याच वरिष्ठांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत आहेत, असेही न्यायालयाने सुनावले. संबंधित अधिकाऱ्यांवर काय कारवाई केली जाईल, याविषयी पोलिस महासंचालकांशी चर्चा करण्याचे आदेश दिले. त्यावर पोलिस महासंचालक पालघर पोलिसांकडून सर्व कागदपत्रे मागवून घेतली असून त्याचा अभ्यास करून योग्य ती कारवाई करतील, असे सरकारी वकिलांनी न्यायालयाला सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Marks Verification : एमपीएससी उमेदवारांसाठी मोठी बातमी! गुणपडताळणीसाठी अर्जाची संधी; जाणून घ्या अंतिम तारीख

सौदी अरेबियाच्या संरक्षणासाठी पाकिस्तान 'येमेन'मधील हुथी बंडखोरांवर एअरस्ट्राईक करण्याच्या तयारीत; करार काय सांगतो?

Karmad News : आईच्या मामाच्या गावाला आलेल्या एकुलत्या एक मुलाचा शेततळ्यात बुडून मृत्यू

EPF Advance Rules : पीएफ खात्यातून पैसे काढायचे आहेत? आधी समजून घ्या नियम, कोणाला किती रक्कम मिळणार?

Marathi News Live Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं जाणून घ्या एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT