मुंबई

भोंदू खरातसह सहा आरोपींना समन्स

CD

भोंदू खरातसह सहा आरोपींना समन्स
ईडीच्या आरोपपत्राची न्यायालयाकडून दखल

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ९ ः  नाशिकचा स्वयंघोषित भोंदू अशोक खरातविरोधातील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) दाखल केलेल्या आरोपपत्राची विशेष पीएमएलए न्यायालयाने नुकतीच दखल घेतली आणि न्यायालयाने खरातसह सहा आरोपींना समन्स बजावले. तसेच पुढील सुनावणीला हजर राहण्याचे आदेश देऊन सुनावणी २२ सप्टेंबरपर्यंत तहकूब केली.

नोंदीवरील प्राथमिक पुराव्यांवरून आरोपींनी फसवणुकीच्या माध्यमातून गुन्ह्यातून मिळणारा पैसा पद्धतशीरपणे निर्माण केल्याचे दिसते. खरातने स्वतःला कृष्णाचा अवतार, धार्मिक व आध्यात्मिक तसेच अलौकिक शक्ती असल्याचे भासवून त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्यांना सातत्याने आपल्या जाळ्यात ओढले, असेही विशेष पीएमएलए न्यायालयाचे न्यायाधीश एस. व्ही. सहारे यांनी नमूद केले. आरोपींनी गुन्ह्यातून मिळालेली रक्कम बिनदोष मालमत्ता म्हणून दाखवून आर्थिक गैरव्यवहार केल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट होते. त्यामुळे सर्व आरोपींविरुद्ध दखल घेण्यासाठी आणि त्यांच्याविरुद्ध कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यासाठी पुरेसे कारण असल्याचे निरीक्षण न्यायालयाने समन्स बजावताना नोंदविले. ईडीच्या म्हणण्यानुसार, खरात हा ४७.७४ कोटी रुपयांच्या कथित आर्थिक गैरव्यवहाराचा सूत्रधार असून, त्याने भाविकांच्या कागदपत्रांचा गैरवापर करून ६० बेनामी बँक खाती उघडली. २०२१ ते २०२६ दरम्यान या खात्यांतून मोठ्या प्रमाणात रोख व्यवहार करण्यात आले. यापैकी ४३ खाती मे २०२१ मध्ये एकाच दिवशी उघडण्यात आल्याचेही यंत्रणेने म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Strait of Hormuz: 'होर्मुझ'चं सोडा, इराणची नवीनच खेळी; अरबी समुद्रापर्यंत ‘रेस्ट्रिक्टेड झोन’ करण्याची योजना, जगावर नवं संकट

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

Adul News : शिवण क्लास न लावल्याच्या रागातून विवाहिने संपविले जीवन; दीड वर्षाच्या मुलाचे मातृछत्र हरपले

SCROLL FOR NEXT