मुंबई

महाराष्ट्र लवकरच पहिले टोकनिकृत राज्य!

CD

महाराष्ट्र लवकरच पहिले टोकनिकृत राज्य!
‘फिनटेक फेस्ट’मध्ये देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास

मुंबई, ता. ९ : महाराष्ट्राला देशातील पहिले ‘टोकनिकृत राज्य’ बनवण्याच्या दिशेने सरकार पावले उचलत असून लवकरच हे काम पूर्ण होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज व्यक्त केला. बीकेसी येथे सुरू असलेल्या ‘ग्लोबल फिनटेक फेस्ट’मध्ये ते बोलत होते.
मुख्यमंत्री म्हणाले, ‘‘मागील वर्षीच्या ‘ग्लोबल फिनटेक फेस्ट’मध्ये महाराष्ट्र टोकनिकृत राज्य करण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला होता. त्यासाठी आता डेल्टा कायदा तयार करण्याचे काम सुरू आहे. जमीन, घर आदी अचल संपत्तीत गुंतलेल्या भांडवलाचे रूपांतर आर्थिक संधीमध्ये करण्याची टोकनिकरण (टोकनायझेशन) ही प्रक्रिया आहे. यासंदर्भातील कायद्यामुळे हे व्यवहार त्वरेने होतील, त्यात पारदर्शकता येईल आणि निष्क्रिय संपत्ती आर्थिक विकासासाठी उपयोगात आणता येईल. या नव्या कायद्याद्वारे जमीनजुमला, घर या मालमत्तेच्या टोकनिकरणासाठी कायदेशीर चौकट बनवली जाईल. या प्रक्रियेत सेबी, शेअर बाजार, उद्योग, तंत्रज्ञान, कायदा आणि शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञही सहभागी झाले आहेत.’’
----
एजंटिक एआय, क्वांटम तंत्रज्ञानाचा वापर
‘‘सरकार सर्वसामान्य शेतकरी, छोटे उद्योग, वंचित नागरिक यांच्यापर्यंत डिजिटल वित्तीय क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ पोहोचवेल. त्यासाठी एजंटिक एआय आणि क्वांटम तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. एजंटिक एआयमधून एआय सहाय्यक उद्योजकाला गुंतवणुकीचे पर्याय सुचवेल, शेतकऱ्यांना आर्थिक सल्ला देईल; मात्र एआयचे नियंत्रण बाह्य संस्थांकडे न राहता नागरिकांच्या हातात हवे,’’ असेही मुख्यमंत्री म्हणाले.
----
नवकल्पनांची प्रयोगशाळा
उद्योग आणि तंत्रज्ञान क्षेत्राने महाराष्ट्राकडे केवळ बाजारपेठ म्हणून न पाहता नवकल्पनांची प्रयोगशाळा म्हणून पाहण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. ‘‘कृषी, एमएसएमई, शहरी विकास, आरोग्य, गतिशीलता, आर्थिक समावेशन, फसवणूक प्रतिबंध आणि सार्वजनिक वित्त व्यवस्थापन या क्षेत्रांतील अभिनव उपाय राज्य शासनासमोर मांडावेत,’’ असेही त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT