मुंबई

गिरगावच्या पालिका शाळेची जागा ट्रस्टला देण्यास विरोध

CD

गिरगावच्या पालिका शाळेची
जागा ट्रस्टला देण्यास विरोध

​पीपीपी तत्त्वावरील प्रकल्पाच्या पुनर्विचारासाठी समिती

सकाळ वृत्तसेवा
​मुंबई, ता. १० : गिरगावातील कुंभारवाडा येथील ऐतिहासिक दुर्गादेवी महापालिका शाळेची जागा सार्वजनिक-खासगी भागीदारी तत्त्वावर एका खासगी संस्थेला देऊन शाळेचा पुनर्विकास करण्याच्या पालिका प्रशासनाच्या निर्णयाला जोरदार विरोध सुरू झाला आहे. महापालिकेच्या मालकीचा हा मोक्याचा भूखंड खासगी संस्थेच्या घशात घालण्याऐवजी पालिकेने स्वतःच्या निधीतून तिथे नवीन अद्ययावत शाळा उभारावी, अशी मागणी लोकप्रतिनिधींनी केली आहे. वाढत्या विरोधामुळे आणि पत्रांच्या भडिमारामुळे अखेर महापालिकेने या संपूर्ण प्रकल्पाच्या पुनर्विचारासाठी विशेष समितीची स्थापन केली आहे.

​नगरसेविका संपदा मयेकर यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधींनी या प्रस्तावाला तीव्र आक्षेप घेतला आहे. शिक्षण विभागाने दिलेल्या माहितीनुसार, दुर्गादेवी शाळेचा भूखंड ‘विरेंद्र स्वरूप मेमोरियल ट्रस्ट’ या संस्थेला हस्तांतरित करण्यासाठी ‘लेटर ऑफ अवॉर्ड’ देण्यात आले आहे. ​संबंधित ट्रस्टने ‘वन टाइम प्रीमियम’सह सर्व कायदेशीर आणि प्रशासकीय शुल्क पालिकेकडे जमा केले आहे. करारातील अटींनुसार संस्थेने ‘एसपीव्ही’ कंपनीची स्थापनाही केली आहे. या कराराला पालिका आयुक्तांची मंजुरी मिळाली आहे. मुद्रांक शुल्काची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. सध्या केवळ कराराच्या अंतिम नोंदणीची प्रक्रिया प्रलंबित असून, ती पूर्ण होताच प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्याचे शिक्षण विभागाचे नियोजन होते.

संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी व अभ्यास करून अहवाल सादर करण्यासाठी प्रशासनाने समिती स्थापन केली आहे. या समितीची पहिली बैठक पार पडली असून, तिचा अंतिम अहवाल प्राप्त झाल्यानंतरच या प्रकल्पाचे भवितव्य ठरणार असल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Online Betting : ऑनलाइन बेटिंगमुळे कर्ज झाल्याने संपविले जीवन; प्रथमेशच्या लेटर नोटमधील माहिती

Palghar News : रुग्णालयातील राड्याला न्यायालयाचा दणका! राहुल घरतची कोठडी वाढली, तिघांचा अटकपूर्व जामीनही फेटाळला आणि अटक वॉरंटची मागणी

Marathi News Live Updates : हडपसरमधील माळवाडीत आठ घरे आगीत भस्मसात; एका घरात सिलेंडरचा स्फोट

Shirur Maratha reservation protest: शिरूरमध्ये मनोज जरांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा; मराठा आरक्षणासाठी पुणे–नगर मार्गावर रास्ता रोको

Takli Rajeray Crime : टाकळी राजेराय पोलिसांची धडक कार्यवाही; दोनशे किलो गोमांस जप्त

SCROLL FOR NEXT