मुंबई

प्रवाशाच्या हल्ल्यात तिकीट तपासनीस जखमी

CD

प्रवाशाच्या हल्ल्यात
तिकीट तपासनीस जखमी
जोगेश्वरीतील घटना; आरोपीला अटक

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १० : तिकीट नसल्याने दंडाची कारवाई टाळण्यासाठी पळ काढणाऱ्या प्रवाशाने तिकीट तपासनीसाच्या चेहऱ्यावर ठोसा मारल्याची घटना जोगेश्वरी रेल्वे स्थानकात बुधवारी घडली. या घटनेत टीसी आशीष गुप्ता यांच्या चष्म्याची काच फुटून उजव्या डोळ्याखाली घुसली. त्यात ते गंभीर जखमी झाले आहे. याप्रकरणी अंधेरी रेल्वे पोलिसांनी प्रवासी अजय धिवर याला अटक केली आहे.
जोगेश्वरी स्थानकाच्या फलाट क्रमांक ३/४च्या चर्चगेट दिशेकडील जिन्याजवळ बुधवारी सायंकाळी ४.५५च्या सुमारास हा प्रकार घडला. तिकीट तपासणीदरम्यान गुप्ता यांनी धिवरकडे तिकीट वा पासची विचारणा केली. तिकीट नसल्याने त्याला ५०० रुपयांचा दंड भरण्यास सांगण्यात आले; मात्र आपल्याकडे केवळ १०० रुपये असल्याचे सांगत त्याने दंड भरण्यास नकार दिला. पुढील कारवाईसाठी धिवरला आरपीएफ कार्यालयात नेण्याचा प्रयत्न करण्यात आला; मात्र त्याने गुप्ता यांच्या हाताला झटका देऊन पळ काढला. मोठ्या शिताफीने गुप्ता यांनी धिवरला अडवले; मात्र त्याने गुप्तांच्या चेहऱ्यावर ठोसा मारला. त्यात चष्म्याची काच फुटून उजव्या डोळ्याखाली घुसल्याने मोठा रक्तस्राव झाला. जखमी अवस्थेतही गुप्ता यांनी धिवरला पकडून ठेवले. आरपीएफ आणि रेल्वे पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून त्याला ताब्यात घेतले. गुप्ता यांना जोगेश्वरी पूर्वेकडील ट्रॉमा रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी डोळ्याखालील जखमेवर सात टाके घातले. उपचारानंतर त्यांना अंधेरी रेल्वे पोलिस ठाण्यात नेण्यात आले. याप्रकरणी गुन्हा दाखल करून धिवरला अटक करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG : भारत-अफगाणिस्तान पहिला सामना १३ ऐवजी १४ सप्टेंबरला? पोलिसांच्या पत्रानंतर काय निर्णय झाला? महत्त्वाच्या अपडेट्स

Marathi News Live Updates : रुग्णालयातील राड्याला न्यायालयाचा दणका! शिवसेनेचे शहरप्रमुख राहुल घरतची कोठडी वाढली, तिघांचा अटकपूर्व जामीनही फेटाळला

केंद्राचा आदेश पण कर्नाटक भूमिकेवर ठाम! काँग्रेसच्या १९३७ सालच्या ठरावाचं होणार पालन, DK सरकारचा आदेश नेमका काय?

Bail Pola Festival : जात-पात विसरून एकाच माळेत; अमळनेर वस्तीत हिंदू-मुस्लिम बांधवांचा बैलपोळा उत्साहात

MPSC paper leak confession : व्यवस्था कुठेतरी भ्रष्ट आहे, हे आम्हीही मान्य करतो ; आमदार विक्रम पाचपुते यांची स्पष्टोक्ती

SCROLL FOR NEXT